आता घरबसल्या मोबाईल ठीक करा. ही कंपनी देतेय फ्री पिक-अप आणि डिलीव्हरी.

अनेकांना आपला मोबाईल खराब झाला किंवा निष्क्रिय झाला की प्रचंड मनस्ताप येतो. कारण अनेकजण मोबाईलद्वारे काम करत असल्यामुळे जर आपल्या मोबाईल मध्ये काही कारणास्तव तांत्रिक बिघाड आला की मनात अनेक प्रश्न येतात. परंतु आता मोबाईल मध्ये बिघाड आल्यास कुठेही जायची गरज नाही. होय ! कारण आता ‘लावा’  या मोबाईल कंपनीने खास लावाच्या ग्राहकांना सोयीस्कर अशी युक्ती लढवली आहे. खरंतर देशांतर्गत स्मार्टफोन निर्माता लावा कंपनीने सोमवारी आपली घरोघरी सेवा ‘सर्व्हिस ॲट होम’ लाँच केली आहे. या कंपनीने देशभरातील ९००० पिनकोडवर ही सुविधा उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे. या सुविधेमुळे ग्राहकांना कंपनीच्या आगामी सर्व स्मार्टफोन्ससाठी घरपोच सेवेचा लाभ मिळणार आहे. लावाने अधिकृत निवेदन जारी करून ही माहिती दिली. 

 

सर्व्हिस रिक्वेस्ट कशी नोंदवाल ?

 

कंपनीचे म्हणणे आहे की, सर्व्हिस रिक्वेस्ट प्राप्त झाल्यानंतर दोन तासांच्या आत प्रतिसाद दिला जाईल आणि ४८ तासांच्या आत समस्या सोडवली जाईल. ही सेवा लावाच्या अधिकृत वेबसाइट, कॉल सेंटर, लावा केअर ॲप आणि अधिकृत व्हॉट्सॲप नंबरवरून घेतली जाऊ शकते. पण त्याचा फायदा फोनच्या वॉरंटी कालावधीपर्यंतच मिळेल. फोनच्या बॉक्सवर छापलेला QR कोड स्कॅन करूनही सर्व्हिस रिक्वेस्ट नोंदवता येईल.

 

मोफत पिक-अप आणि डिलीव्हरी

 

फोनमधील सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरशी संबंधित किरकोळ समस्या घरबसल्या दूर केल्या जातील, असे कंपनीचे म्हणणे आहे. दुसरीकडे फोनमध्ये कोणतीही मोठी समस्या असल्यास, फोन जमा करून सेवा केंद्रात नेले जाईल. दुरुस्तीनंतर तो ग्राहकांच्या घरी परत दिला जाईल. मोफत पिक-अप आणि डिलीव्हरी व्यतिरिक्त लावा आपल्या ग्राहकांना येणाऱ्या सर्व फोनवर मोफत स्क्रीन बदलण्याची सेवा देखील देत आहे.

 

ग्राहकांना सेवा देण्यामागचे कारण

 

लावा इंटरनॅशनल लिमिटेडच्या ग्राहक सेवा प्रमुख सत्या सती म्हणाले, “ग्राहकांच्या विक्रीनंतरच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी घरपोच सेवा हा एकच उपाय आहे. आम्ही आमच्या आगामी सर्व स्मार्टफोनसाठी ही सेवा देत आहोत. याचे कारण म्हणजे ग्राहकांचा अनुभव सुधारणे आणि सेवा केंद्रांवरील लांबलचक रांगा टाळणे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी कंपनीने अधिकृत सेवा भागीदारांशीही भागीदारी केली असल्याची माहिती लावा यांनी दिली आहे. माहितीनुसार, देशभरात लावा ५० ऑन व्हील सेवेची ७०५ सेवा केंद्रे आहेत. तर अश्याप्रकारे जर तुम्हीदेखील या कंपनीचे ग्राहक असाल तर नक्कीच या सेवेचे लाभ घेऊ शकता. ही माहिती इतरांना देखील शेअर करा. 

प्रिया गोमाशे: नमस्कार, मी प्रिया गोमाशे मला लेखनाची आवड असल्यामुळे विविध विषयांवर आणि घडामोडींवर लेख लिहते.
Recent Posts