ऋतुराज गायकवाड या सुंदर अभिनेत्रीला करतोय डेट ?

अभिनेत्री किंवा अभिनेता एखाद्या व्यक्तीला डेट करतोय याबद्दल नेहमीच चर्चा होत असते. मात्र यात क्रिकेटर्स देखील मागे नाही आहेत . अभिनय क्षेत्र आणि क्रिकेट याचा पूर्वीपासूनच फार जवळचा संबंध राहिलेला आहे. अश्या अनेक अभिनेत्री आहेत कि ज्यांच्या क्रिकेटर्ससोबत अफेअर्सच्या चर्चा बऱ्याचदा बघायला आपल्याला यापूर्वी मिळालेत. यासोबतच अशी एक जोडपीसुद्धा आहेत, ज्यांनी एकमेकांसोबत लग्न केलं आहे. ते म्हणजे अनुष्का-विराट तसेच जहीर खान- सागरिका घाटगे ही जोडपी आपल्याला माहीतच असतील पण सध्या आता भारताचा यंग क्रिकेटपटू क्रिकेटर ऋतुराज गायकवाड़ (Ruturaj Gaikwad) आणि मराठी अभिनेत्री सायली संजीव (Sayali Sanjeev) हे दोघ एकमेकांना डेट करत असल्याच्या अनेक चर्चा येत आहेत. मात्र या दोघानांही हि गोष्ट अदयाप मान्य केलेली नाही आहे.

कोण आहे सायली संजीव (Sayali Sanjeev) :

तुम्हाला सर्वाना प्रश्न पडला असेलच कि हि सायली संजीव (Sayali Sanjeev) आहे तरी कोण आणि ती काय करते , तर आज आम्ही तुम्हाला सायलीबद्दल थोडी माहिती सांगणार आहोत.

सायली संजीवने (Sayali Sanjeev) हिने झी मराठीतील ‘काहे दिया परदेस’ या मालिकेत काम केलं या मालिकेतून तिला भरपूर प्रसिद्धी मिळाली आणि लोकांच्या घराघरात ती पोहोचली, या मालिकेत सायलीचे गौरी हे व्यक्तीमत्व लोकांना फार आवडले .सायली ‘फ्रेश फेसचा’ अवॉर्डसुद्धा देण्यात आला.

सायली संजीवने (Sayali Sanjeev) हिने नाशिकच्या एचपीटी आर्ट्स आणि आरवायके सायन्स कॉलेजमधून बीए पॉलिटिक्सचे आपले पदवीधर शिक्षण पूर्ण केले. तिला कॉलेजकडून सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारहि मिळाला होता .अभिनयात आव ड असल्याने तिने अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला.सायली संजीव एका म्युझिक व्हिडीओमुळे टीव्हीवर आली ज्यामध्ये सुशांत शेलारने तिच्यासोबत काम केले होता, सायलीचा 9x झकास टॉप कॉन्टेस्टच्या टॉप-10 सर्वोत्कृष्ट नायिकांमध्ये समावेश करण्यात आला.

 

सायली संजीवचा जन्म 1993 मध्ये झाला, ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते , तिने स्वारोवस्की जेम्स, डेंटझ, क्विकर आणि बिर्ला आयकेअरसाठी मॉडेलिंग देखील केलं आहे.

मॉडेलिंग क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर, सायली संजीवने राजू पार्सेकर यांच्या ‘पोलीस लाइन्स – एक पूर्ण सत्य’ या चित्रपटासह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय आटपाडी नाईट्स, मन फकिरा, एबी अँड सीडी आणि द स्टोरी ऑफ पैठणी सारखे चित्रपटमध्येही तिने अभिनय केले आहेत.

सायली संजीवला (Sayali Sanjeev) छोट्या पडद्यावर ‘परफेक्ट पाटी’, ‘गुलमोहर’ यांसारख्या शोमधून भरपूर यश मिळाले. अलीकडेच तिने ‘शुभमंगल ऑनलाइन’ या टीव्ही मालिकेतही काम केलं आहे

 

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts