हवेतून ऑक्सिजन निर्मिती,ऑक्सिजन तुटवडय़ावर मार्ग ?

पालघर जिल्ह्यात हवेतून ऑक्सिजन निर्मितीसाठी कोरोनाच्या संकटात जाणवणाऱया ऑक्सिजनच्या तुटवडय़ावर मार्ग काढण्यासाठी हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. त्यासाठी पालकमंत्री दादा भुसे यांच्या निर्देशानुसार ३ कोटी २० लाखांच्या प्रशासकीय मंजुऱया जिल्हा विकास योजनेतून देण्यात आल्या आहेत. त्यापैकी पालघर व जव्हार येथे तत्काळ काम सुरू करण्याचे आदेशही देण्यात आले असून उर्वरित प्रकल्प लवकरच पूर्ण होतील.

करोना रुग्णसंख्येत होत असलेल्या वाढीनंतर मुंबई येथील ऑक्सिजनचा तुटवडा भासू लागला आहे. या पार्श्वभूमीवर कायमस्‍वरूपी उपाययोजना म्‍हणून १२ रुग्‍णालयांमध्‍ये मिळून १६ प्राणवायू निर्मिती प्रकल्‍प उभारण्‍याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. वातावरणातील हवेतून प्राणवायू निर्माण करून तो रुग्‍णांना पुरवण्‍यात येईल. या प्रकल्‍पांतून दररोज ४३ मेट्रिक टन ऑक्सिजन निर्माण होणार असून त्यासाठी ९० कोटी रुपये खर्चाच्या निविदा मागवण्यात आल्या आहेत. मंजुरी मिळताच एका महि‍न्‍यात हे प्रकल्‍प उभारले जाणार आहेत.

असा साकारणार प्रकल्प :

वातावरणातील हवेतून प्राणवायू निर्मिती (पी. एस. ए.) तंत्राद्वारे जागेवर प्राणवायूची निर्मिती करणारे हे प्रकल्‍प असतील.
पालिकेच्‍या रुग्णालयांची ऑक्सिजनची गरज प्रकल्‍प उभारण्‍यासाठी लागणाऱ्या जागेची तसेच तेथील विद्युत पुरवठ्याची क्षमता लक्षात घेऊन एक किंवा दोन यंत्रे संबंधित ठिकाणी बसविले जातील.या प्रकल्पामुळे ऑक्सिजन सिलिंडर सांभाळण्याची व भरण्याची दगदग राहणार नाही. परिणामी यंत्रणेवरचा ताण कमी होण्यास मोठी मदत होणार आहे.

प्राणवायू पुरवठादारांकडून जम्बो सिलिंडरद्वारे मिळणाऱ्या प्रति लिटर प्राणवायूच्या खर्चाच्या तुलनेत पालिकेच्या प्रकल्पांतून त्‍यापेक्षा अर्ध्‍याहून कमी दराने प्राणवायू निर्मिती होणार असून हे प्रकल्‍प किमान १५ वर्षे ते कमाल ३० वर्षे सुरू राहू शकतात.

असा तयार होणार प्राणवायू:

वातावरणातील हवा शोषून, पी. एस. ए. तंत्राचा वापर करून रुग्‍णांना प्राणवायू पुरवठा करताना, सर्वप्रथम यंत्रांमध्‍ये योग्‍य दाबाने हवा संकलित (कॉम्‍प्रेस) केली जाते. त्‍यानंतर ती हवा शुद्ध (फ‍िल्‍टर) करण्‍यात येते. त्‍यामुळे हवेतील अशुद्ध घटक जसे की, धूळ, तेल/इंधन यांचे अतिसूक्ष्‍म कण, इतर अयोग्‍य घटक गाळून वेगळे केले जातात.
या प्रक्रियेनंतर उपलब्‍ध झालेली शुद्ध हवा ‘ऑक्‍स‍िजन जनरेटर’मध्‍ये संकलित केली जाते. ऑक्‍स‍िजन जनरेटरमध्‍ये असलेल्‍या झि‍ओलीट या रसायनयुक्‍त मिश्रणाद्वारे या शुद्ध हवेतून नायट्रोजन व ऑक्‍स‍िजन हे दोन्‍ही वायू वेगळे केले जातात.वेगळा करण्‍यात आलेला ऑक्‍स‍िजन हा योग्‍य दाबासह स्‍वतंत्रपणे साठवला जातो. तेथून तो पाइपद्वारे रुग्‍णांपर्यंत पोहोचवला जातो.

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts