कोल्हापुरातील पहिलवान मर्दाची लैच भारी ताकद, उचलली “महाराष्ट्र केसरी” ची  गदा.

सातारा येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटील यांने विजेतेपद मिळवले. २१ वर्षांपूर्वी हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी अशा दोन्ही प्रतिष्ठेच्या केसरीचा मानकरी असलेल्या विनोद चौगुले यांच्यानंतर पृथ्वीराजने हे यश कोल्हापूरला खेचून आणले आहे. याच बरोबर गेल्या दोन दशकांचा पदकाचा वनवास संपला असून कोल्हापूरकरांच्या प्रतीक्षेला पृथ्वीराजच्या रूपाने गोड फळ मिळाले आहे.

पृथ्वीराज २००९ ला मोतीबाग तालमीत दाखल झाला. महान भारत केसरी दादू चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचा कुस्तीतला प्रवास सुरू झाला.पन्हाळा तालुक्यातील देवठाणे या गावच्या पृथ्वीराजने शाहू कुस्ती केंद्र शिंगणापूर येथे सुरुवातीला कुस्तीचा सराव केला. त्याची सुरुवात कोल्हापुरातील मोतीबाग तालीम मध्ये २२ किलो वजनी गटातून झाली होती. त्याचे काका संग्राम पाटील, जालिंदर मुंडे आदींनी त्यास मार्गदर्शन केले. जागतिक कुमार स्पर्धेत कास्यपदक मिळाल्याने त्यास सैन्यदलात नोकरीची संधी मिळाली. तर दुसरीकडे ट्रिपल महाराष्ट्र केसरी, पोलीस उपाधीक्षक नरसिंग यादव यांच्यासोबत भारतीय कुस्ती शिबिरात त्याचा सराव सुरू असतो.

कोल्हापुरात आनंदी आनंद:

मानाची चांदीची गदा मिळवीनाऱ्या पृथ्वीराजमुळे कुस्तीची पंढरी असलेल्या कोल्हापुरात आनंदाचा क्षण आला आहे. गेली अनेक वर्ष मी तसेच नंदू आबदार, अशोक माने, कौस्तुभ डाभळे अशा अनेक मल्लांनी महाराष्ट्र केसरी मिळवण्यासाठी कसून सराव केला. दुर्दैवाने आणि नशिबाने साथ मिळाली नाही. पण पृथ्वीराजच्या रुपाने कोल्हापूरला महाराष्ट्र केसरीचा ‘किताब मिळाल्याचा हा सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. आता पृथ्वीराजने इथेच न थांबता ऑलिम्पिकचे पदक मिळवण्याचे ध्येय बाळगले पाहिजे.”मल्लांनी साखर पेढे वाटून आनंद व्यक्त केला आहे.

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts