वैद्यकीय शाखेच्या परीक्षांबाबत विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींशी आता वैद्यकीय परीक्षा सुद्धा समोर ढकलावी अशी विनंती केली आहे.. कोरोनामुळे निर्बंध आहेत त्यामुळे विद्यार्थींना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय. परीक्षेला बसणारे अनेक विद्यार्थी कोव्हीड पॉझिटिव्ह आहेत, अशी माहिती विद्यार्थी संघटनांनी दिली. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे राज्य मंत्री देशमुख म्हणाले.
एमबीबीएस शेवटच्या वर्षाची परीक्षा उत्तीर्ण होणारे ५५०० डॉक्टर आपल्याला उपलब्ध होतील. जिथे आवश्यकता आहे तिथे हे डॉक्टर नेमण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच 15 ते 16 हजार नर्स परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आहेत. त्यांच्या नोंदणी प्रक्रियेला गती दिली आहे. त्यामुळे या नर्सही कर्तव्यासाठी उपलब्ध होतील असेही ते म्हणाले. ज्या राज्यात कोविडचा फारसा प्रादुर्भाव नाही, त्या राज्यातून डॉक्टर्स, नर्स उपलब्ध करून देण्याची मागणी नोंदवली आहे. सेवानिवृत्त झालेले डॉक्टर, नर्स यांची सेवा घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. संकट मोठं असलं तरी महाराष्ट्र तत्परतेने पावलं उचलत असल्याचे ते म्हणाले.
दहावी-बारावीच्या परीक्षा जून किंवा त्यानंतरच :
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने दहावी, बारावीची ऑफलाइन परीक्षा जून महिन्यात किंवा त्यानंतर घ्यावी, असे मत ६९ टक्के विद्यार्थी, शिक्षकांनी मांडले. दहावी, बारावीच्या परीक्षेसंदर्भात राज्य शिक्षक परिषदेकडून राज्यातील पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे ऑनलाइन सर्वेक्षण करण्यात आले. यात २,६०० हून अधिक शिक्षक, विद्यार्थी सहभागी झाले होते. सध्याच्या वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर तब्बल ४२.२ टक्के शिक्षक, विद्यार्थ्यांनी जूनमध्ये, तर ३३.१ टक्के विद्यार्थी, शिक्षकांनी जुलै महिन्यात परीक्षा घ्यावी, असे मत मांडले. एकूण ६९.३ टक्के विद्यार्थी, शिक्षकांनी सध्या परीक्षा घेण्यास विरोध दर्शविला होता.