मुख्यमंत्र्यांची व्हिडिओ कोरोना आढावा बैठक, ‘कोरोनाची दुसरी लाट त्सुनामीसारखी’,असा केला खुलासा.

मुंबई: राज्यात आलेली कोरोनाची दुसरी लाट त्सुनामी सारखी असून एप्रिल अखरेपर्यंत राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या १२ लाखांवर जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील व्यापारी संघटना आणि त्यांच्या प्रतिनिधींशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी ही माहिती उघड झाली.


बैठकीत उपस्थित असणारे मान्यवर:
या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड, राज्य टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी आदी उपस्थित होते.

लाट रोखण्यासाठी सरकार करणार हे उपाय
राज्यात गंभीर परिस्थिती आहे. विषाणूचा नवा स्ट्रेन त्याचा फैलाव वेगाने करत आहे आणि तो डबल म्युटंट आहे. तो तरुण आणि मुलांना घातक आहे. त्यासाठी विषाणूची साखळी तोडणे हाच यावर उपाय आहे. ही दुसरी लाट त्सुनामीसारखे दिसते आहे. ती रोखण्यासाठी करता येतील, ते सर्व प्रयत्न करावे लागतील, असं टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी यांनी सांगितलं.


30 पट रुग्णसंख्या वाढली

राज्यात फेब्रुवारीपासून आतापर्यंत 30 पट रुग्णसंख्या वाढ झाली आहे. उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 4 लाखांवर पोहचली होती. गतवर्षीच्या सप्टेंबर 2020 मधील रुग्णसंख्येपेक्षा कित्येक पटींनी रुग्ण संख्या झाली आहे. भारत सरकारच्या अंदाजानुसार एप्रिल अखेरीस 12 लाखांवर रुग्णसंख्या पोहचू शकते, असं आरोग्य विभागाचे प्रधान सचिव व्यास यांनी सांगितलं.

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts