३०० करोड ची मालकीण असणारी,”राधिका” आता मालिका संपल्यानंतर करते तरी काय?.

काही वर्षांपुर्वी सुरू झालेली माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका देखील प्रचंड गाजली होती. ही मालिका जवळपास एक वर्ष टीव्हीवर सुरू होती. या मालिकेने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले. मात्र, सरते शेवटी ही मालिका खूप कंटाळवाणे होत असल्याचे अनेकांचे म्हणणे होते. काही महिन्यापूर्वी या मालिकेचा शेवट हा करण्यात आलेला आहे. या मालिकेमध्ये अभिजित खांडकेकर याने गुरुची भूमिका साकारली होती, तर त्याच्या पत्नीची भूमिका अनिता दाते हिने साकारली होती.

यातील काही मालिकांचे तर कौतुक साता-समुद्रापार देखील झाले. यामध्ये श्रीयुत गंगाधर टिपरे, होणार मी सुन या घरची, उंच माझा झोका, एका लग्नाची दुसरी गोष्ट यासारख्या मालिका यांचा समावेश होता. या मालिकेनंतर इतर मालिका देखील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन फार मोठ्या प्रमाणात करत होत्या.
वैदर्भीय संस्कृती असलेले कुटुंब यामध्ये दाखवण्यात आलेले होते. तर त्यांचा मुलगा हा अतिशय लाडका असतो. यात तिने राधिका हे पात्र अतिशय चांगल्या पद्धतीने रंगवले होते. गुरुचे मालिकेत अनेक प्रेमप्रकरण दाखवलेले आहे. त्यामध्ये शनया हे पात्र देखील अतिशय चांगले गाजले होते. या पात्राला अभिनेत्रींनी चांगला न्याय दिला होता. ही मालिका नुकतीच संपली आहे, त्यामुळे आता राधिका नेमकी काय करत आहे, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना अनेक दिवसापासून पडलेला आहे, तर आम्ही आपल्याला या लेखांमध्ये राधिका बद्दलच माहिती देणार आहोत.

सध्या राधिका काय करते!

राधिका म्हणजे अनिता दाते ही आपल्या पतीसोबत राहते.तिच्या पतीचे नाव चिन्मय असे आहे. राधिकाने सांगितले की, मी आणि चिन्मय दोघेच घरात असतो. कामाच्या व्यापामुळे आम्हाला दोघांना बोलायला वेळ भेटत नाही. मात्र, आता मालिका संपलेली आहे. त्यामुळे माझ्याकडे थोडा वेळ होता. त्यामुळे आम्ही बाहेर फिरण्यासाठी निघालो आहोत.

पतीने आता ठरून आमचा फिरण्याचा प्लॅन केला आहे, म्हणून आम्ही पाच दिवस मस्तपैकी जंगलामध्ये आम्ही फिरलो.मला पक्षांची अधिक ओळख नाही. मात्र, कबूतर, कोकिळा किंवा इतर पक्षाचे मी आवाज ओळखू शकते. आणि पक्षांना ओळखू देखील शकते. मात्र, माझा पती चिन्मय पक्षीप्रेमी आहे, तो जंगलामध्ये अनेक गोष्टी पाहू शकतो. त्याचा आनंद घेऊ शकतो. तसेच अनेक पक्षांना ओळख देखील शकतो, असे ती म्हणाली. या पाच दिवसांमध्ये आम्ही खूप एन्जॉयमेंट केली, असेही ती म्हणाली.आम्ही वानोशी फॉरेस्ट मध्ये फिरलो. तिथे आम्हाला प्रवीण देसाई यांनी खूप मदत केली. प्रविण देखील आमचा मित्र झालेला आहे. तसेच विशाल देखील आमचा मित्र झाला आहे, असे ती म्हणाली. भविष्यामध्ये आम्ही पुन्हा एकदा फिरायला इकडे येऊ, असे ती म्हणाली. या वेळी आम्ही माशावर ताव मारला. मला मासे खूप आवडतात आणि आम्ही मासे भरपूर खाल्ले, असेही ती म्हणाली. माझ्याकडे आगामी काही प्रोजेक्ट आहेत आणि लवकरच याबाबत मी आपल्याला माहिती देईल, असेही तिने या वेळी बोलताना सांगितले.

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts