हिरकणीची परिस्थिती २१ व्या शतकातही तीच, का?

शिवछत्रपतींच्या काळातील हिरकणी ने आपल्या तान्ह्या बाळा साठी खुप धडपड केली, तिचे ते शौर्य महाराजांनी जाणले आणि तिचा यथोचित सन्मान केला. आणि गडाचे दरवाजे बंद करण्यासाठी नवा नियमही बनविला याच्या सारख्या असंख्य रयतच्या हिताचे निर्णय करणाऱ्या राज्याला आपणही जाणता राजा म्हणतो ते असेच थोडी. पण याच रयततेच्या सुखासाठी धडपडणाऱ्या राज्याच्या राज्यात २१व्या शतकातही एका हिरकणीला आजही आपल्या कुटुंबासाठी धडपड करावी लागतच आहे.

महादरवाजा मेट यासारख्या असंख्य आदिवासी पाड्यातील महिलांना आज हिरकणी बनून पिण्याच्या पाण्यासाठी धडपड करावी लागत आहे. हे दाहक वास्तव आपल्या महाराष्ट्राच्या मातीत घडत आहे. आजही अनेक भागांत खास करून आदिवासी आणि कमी विकसित क्षेत्रात हेच पाण्याचे वास्तव आहे. पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट, भटकंती या महिलांसाठी जणू पाचवीलाच पुजलेली आहे. आपण फक्त काही निवडक शहरांचा समावेश आपल्या विकासाच्या यादीत केला आहे, पण आपण या गरीब भारतीय जनतेला कायमच कमी लेखले हे वास्तव या साध्या पाण्याच्या प्रकरणातून दिसते.

व्हिडिओ बघा

यंदा मुसळधार पावसाने संपूर्ण राज्याला झोडपले. अजूनपर्यंत अनेक भागात अवकाळी पाऊस सुरू होता, पण अनेकांच्या नशिबी असलेली पाण्याची फरफट अजून काही केल्या थांबली नाही. महिलांना पन्नास फूट खोल विहिरीतून उतरून, जीव धोक्यात घालून पाणी आणावे लागत आहे.

या हिरकण्यांना या पुरोगामी महराष्ट्रात त्यांचा पाण्याचा अधिकार मिळेल काय हो???

आम्ही जे पाणी सध्या पितो ते शासनाने पिऊन दाखवावे आमदार, खासदार यांनी आमच्या घरात येऊन हे पाणी पिऊन दाखवणार का असा प्रश्नही येथील नागरिकांनी केला आहे.  तर भिवंडीत आमदार-खासदार केंद्रीय मंत्री असून शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी नदीपात्रात खड्डा मारुन गढूळ पाणी पिण्याची वेळ येत असल्याने नागरिकांनी प्रथम पाण्याची समस्या दूर करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. अश्याच महाराष्ट्रतील घडामोडी माहिती करून घेण्यासाठी आमच्या “मराठी shout” च्या Instagram आणि Facebook अकाउंट्स ना फॉलो करा आणि राज्याची माहिती मिळवा.

 

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts