प्रख्यात अभिनेता आणि मॉडेल म्हणून प्रसिद्ध असलेला मिलिंद सोमण सोशल मीडिया वर वेगवेगळ्या कारणासाठी नेहमीच चर्चेत असतो . गेल्या काही दिवसापूर्वी त्याने गोवा च्या किनारी एक हॉट फोटोशूट केला होता त्यासाठी त्याला ट्रोल वव्हावे लागले होते व तो वादाच्या भोवऱ्यात सापडलेला होता. मात्र त्याचा या कृती चे त्याची पत्नी अंकिता गोवर हिने समर्थन केले होते. मात्र तिलाही लोकांनी इंटरनेट वर ट्रॉल केलं होतं . त्यांचं प्रेम आणि लग्न हि जगावेगळी कहाणी आहे. त्याला सात वर्ष पूर्ण झाले असून त्यानिमित्त मिलिंद ने एक पोस्ट शेअर केली होती .
एक आदर्श कपल्स म्हणून मिलिंद आणि अंकिताला ओळखले जाते दोघांच्या रिलेशनशिपमधील बॉण्डिंग हे अनेकांसाठी कुतुहुलाचा विषय ठरतो.त्याचें फिटनेस संबंधित विडिओ नेंहमीच सोशल मीडिया वर व्हायरल होत असतात. चाहत्यांकडून त्यानां मोठया प्रमाणात प्रसिद्धी मिळताना दिसते. त्याचा रिलेशनशिपला सात वर्ष पूर्ण झाले त्यासंबंधी त्यांनी एक रोमँटिक फोटो शेअर केला होता त्याला चाहत्यांनी चांगलाच प्रतिसाद मिळाला.
मिलिंद आणि अंकिताच्या लग्नाला तीन वर्ष झाली आहेत त्यापूर्वी त्यांनी एकमेकांना चार वर्ष डेट केले होते. मिलिंद ने अंकिताबरोबर फोटो शेअर करूत कॅप्शन मध्ये नमूद केले कि “अंकिताची मला नेहमीच साथ राहिली आहे तिचे सहकार्य मला महत्वाचे ठरले सात वर्षी आम्ही एकत्र घालवल्यानंतर आम्हला जे जाणवले ते अतिशय महत्वाचे ठरले . आम्ही जवळपास अक्ख जग फिरलो समुद्राची खोली मोजण्यापर्यंत ते उंच उंच पर्वतावर जाण्यापर्यंत अश्या अनेक गोष्टी आम्ही एकत्रित शेअर केल्या. देशभरात अनेक शर्यतीत भाग घेणे, जहाजांचा प्रवास, जंगल सफारी, वाळंवंटात फिरणे हे सारे आमच्यासाठी भन्नाट होते”.
अंकितानंही एक फोटो शेअर केला व तिनं लिहिलं की, सात वर्षे निघून गेली.आता असे वाटत आहे की काही क्षणच झाले आहेत. मी आशा करते की असे अनेक आनंदाचे क्षण आमच्या वाट्याला नेहमीच येत राहतील. तुला यासाठी धन्यवाद द्यायला मला आवडतात की, तु जसा आहेस तसा तु राहिला आहेस.
52 वर्षांच्या मिलिंदनं 26 वर्षांच्या अंकिताशी लग्न केलं होतं. वयामुळे त्या दोघांना ट्रोल करण्यात आले होते. एका मुलाखतीत त्यानं सांगितले होते की, ज्यावेळी ते पहिल्यांदा भेटले तेव्हा त्यांना लग्नात काहीही रस नव्हता मात्र चार वर्षांच्या डेटिंगनंतर त्यांना असे जाणवले की आपण एकमेकांशिवाय राहु शकत नाही त्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला.