9 मार्च 2022 ला भारताने सोडली पाकिस्तान वर मिसाईल आता होणार का युद्ध ?

नेहमीच भारताचे नाव पुढे करून त्यावर आपल्या देशातील लोकांना बनवणारा देश म्हणजे पाकिस्तान. जेव्हा पासून पाकिस्तान चा जन्म झाला तेव्हा पासून पाकिस्तान भारताला आपला शत्रू मानतो. भारताचे कसे वाईट होईल याची तो नेहमी वाट पाहतो. चार युद्धे लढली तरी त्यांना यातील एक ही जिंकता आल नाही मग पाकिस्तान खोटे सांगत नसेल तर कश्या वरून .

 

नेमके काय झाले-

नेहमीचा मेन्टेनन्स चा सराव चालू असताना 9 मार्च 2022 रोजी भारता कडून मिसाइल फायर झाली आणि ती मिसाईल पाकिस्तान मध्ये चंनी याठिकाणी म्हणजे जवळ पास 124 किलोमीटर पाकिस्तान मध्ये जाऊन आदळली. 3 घर जमीनदोस्त झाली आणि काही वाहनाचे नुकसान झाले. यात कोणतीही मनुष्य हानी झाली नाही.

 

मिसाईल असून सुद्धा नुकसान इतके कमी-

ही एक ब्रह्मोस्त्र मिसाईल होती आणि त्यावर कोणतेही हत्यार नव्हते. त्यामुळे ही एवढी विनाशक झाली नाही . 

मॅक 3 ही त्याची स्पीड होती.म्हणजे आवाजाच्या 3 पट वेगाने ही मिसाईल गेली आणि जास्त वेग असल्यामुळे ही मिसाईल कोणतेही हत्यार नसताना एवढे नुकसान झाले.

 

आतंरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिक्रिया –

असे मिसाईल मिस फायर म्हणजे चुकून मिसाईल सुटणे खूप वेळेस होते. त्यामुळे या कडे आतंरराष्ट्रीय पातळीवर नक्की कठोर प्रतिक्रिया नसेल. पण भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही अण्वस्त्र धारी देश आणि त्यातून त्यानं मधील कटुता सर्वाना माहिती आहे. आज घडीला दोन्ही देशकडून एक पोक्त पणे यावर संभाषण झाले. भारताने मिसाईल चुकीने डागले गेले असे ऑफिसल रेकॉर्ड वर म्हटले आहे

 

पाकिस्तानची काळजी –

पाकिस्तानचे सैन्य प्रामुख्याने या आधीच भारता कडील अश्या सुपरसोनिक मिसाईल बाबत चिंता व्यक्त उघड पणे केली होती. आणि सध्या च्या चुकून फायर झालेल्या मिसाईल वर पाकिस्तानी वायू दल काही सुद्धा करू शकले नाही. मिसाईल रोख्यण्यासाठी रडार तसेच मिसाईल डिस्ट्रोयेर सुद्धा कामी आले नाही त्यामुळे अवघ्या 3 मिनिटात 124 किलोमीटर पाकिस्तानात जाऊन मिसाईल कोसळले.

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts