अशक्य असलेले मंगळ मिशन, नासाच्या प्रयत्नामुळे यशस्वी…केले हेलिकॉप्टर चे मंगळावर उड्डाण !

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाच्या इतिहासामध्ये आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. मंगळ ग्रहावर पाठवण्यात आलेला नासाचा हेलिकॉप्टर Ingenuity ने आज पहिल्यांदा यशस्वी उड्डाण केले. जवळपास सहा वर्षांच्या मेहनतीनंतर तयार करण्यात आलेल्या या हेलिकॉप्टरच्या उड्डाणाकडे सगळ्या जगाचे लक्ष लागले होते. नासाकडून या ऐतिहासिक घटनेचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.

१६ एप्रिल रोजी मिळालेल्या ताज्या अपडेटनुसार, हेलिकॉप्टरने रॅपिड स्पिन चाचणी यशस्वी केली आहे. आता या हेलिकॉप्टरला मंगळावरील वातावरणात उड्डाण घ्यावे लागणार आहे. नासाने दिलेल्या माहितीनुसार हेलिकॉप्टरने टेक ऑफ घेतल्यानंतर काही अंतर फिरण्यास यशस्वी झाले तरी या मंगळ मोहिमेला मोठे यश मिळणार आहे. हेलिकॉप्टर लँड झाल्यानंतरही कार्यरत असल्यास आणखी चार उड्डाण केले जाऊ शकते.

‘Ingenuity’ हेलिकॉप्टरने मंगळ ग्रहावरील जेजेरो क्रेटरमध्ये तयार करण्यात आलेल्या एका तात्पुरत्या हेलिपॅडवरून उड्डाण घेतले. पृथ्वीशिवाय इतर ग्रहावर पहिल्यांदा हेलिकॉप्टर उडाले. नासाच्या ‘Ingenuity’ या जवळपास १.८ किलोच्या रोटरक्राफ्टने आपल्या चार कार्बन-फायबर पातींच्या आधारे उड्डाण घेतले. या पाती प्रति मिनिटाला २५०० वेळा फिरतात. हा वेग पृथ्वीवर असलेल्या हेलिकॉप्टरच्या पातींच्या रोटेटिंग वेगापेक्षा जवळपास पाचपट अधिक आहे. मंगळावरील वातावरण पृथ्वीच्या तुलनेत १०० पट अधिक हलकं असल्यामुळे पातींच्या क्षमता अधिक आहे.

 

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts