अंतराळात अनेक गोष्टी पाठविणे असो की लोकांना अंतराळ भ्रमण करण्याचे त्यांचे स्वप्न असो ते अशक्य गोष्टी ही शक्य करून दाखवतात.रोज जनमानसात मिम शेअर करून आपली हटके ओळख असणाऱ्या या उद्योगपतीने आता माकडवरा एक अनोखा प्रयोग केला आहे. त्यांच्या २०१६ मध्ये स्थापित एक कंपनी जी मेंदू वरती अभ्यास करत आहे.
न्युरालिंक (Neuralink)ही मजातंतू वरती काम करत असून त्यांनी मेंदू व यंत्र यांना जोडून एक यांत्रिक उपकरण विकसित केले आहे, याच उपकरण किती चांगल्या प्रकारे काम करू शकतो हे दाखविण्याचा त्यांचा उद्देशाने त्यांनी हा व्हिडिओ बनविला आहे.
न्युरालिंक यांनी नुकताच प्रदर्शित केलेल्या व्हिडिओ मध्ये एक पेज नावाचे माकड आहे, तो पॉन्ग हा गेम खेळताना दिसत आहे आणि त्याचे संपूर्ण श्रेय हे त्याच्या डोक्यात बसविलेल्या न्युरालिंक यंत्रा चे. न्युरालिंक हे यंत्र माकडाच्या मज्जा तंतू मधून आलेली माहिती वापरून पॉन्ग या गेम मधली खेळण्याचे यंत्र हे फक्त मेंदू ने हाताळत आहे.
न्युरालिंक सांगने असे की, या पेज माकडाच्या मेंदूच्या दोन्ही बाजूला न्युरालिंक चीप अवघ्या सहा हप्त्यांपूर्वी बसवली आहे. न्युरालिंक चीप ही २,००० इलेक्रोड्स वापरून पेज च्या मेंदू आणि हाताच्या हालचालींवर लक्ष ठेवते. आणि त्याची जमा केलेली माहिती वापरून हे खेळण्याचे यंत्र फक्त पेज च्या मेंदूच्या हालचालीने हाताळल्या जाते.
न्युरालिंक कंपनीचा असा दावा आहे की त्यांना,’ अर्धांगवायू नी ग्रासले आहे त्यांनी शरीराची हालचाल न करता मोबाईल फोन हाताळता यावा, तेही फक्त त्यांच्या मेंदू द्वारे. ते आपले काम करतील ,तेही अगदी काम करण्याच्या फक्त हात हलविण्याच्या कल्पनेने.