कशी असायला हवी तुमची सकाळ? | Best Morning Routine

कशी असायला हवी तुमची सकाळ?

असे काय केल्याने तुम्ही तुमची सकाळ सुंदर बनवू शकता?

का आयुष्यात यशस्वी होण्यासाठी महत्वाची असते सुंदर सकाळ?

का एक चांगली सकाळ तुम्हाला मनाने व शरीराने स्वस्त ठेऊ शकते ?

काय काय फायदे असतात एक चांगल्या सकाळ चे ?

वरील सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला खाली मिळेल.
तुम्ही कधी विचार केला नसेल की सकाळी केलेली एक चांगली दिवसाची सुरुवात तुमचा आयुष्य बदलू शकते ते कसं बघू या.

आपण कधी आपला Comfort Zone सोडण्याचा प्रयत्नच करत नाही. आता प्रश्न पडला असेल Comfort Zone म्हणजे नेमकं काय ? Comfort Zone म्हणजे साध्या शबब्दात आपल्याला लागलेल्या चुकीच्या सवय उदाहरणार्थ खूप झोपणे,उशिरा उठणे ,वेळ वाया घालवणे मुळात स्वतःला एक वाईट बंधनात अडकवणे. जर आपल्याला एक चांगली सुरुवात करायची असेल आणि आयुषयात यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला आधी आपला Comfort Zone सोडावा लागेल.

काय करावे ?

  • आदल्या दिवशी रात्री सकाळी उठायचा एक वेळ निश्चित करावा. सकाळी लवकर उठल्याने पोसिटीव्ह Vibes मिळतील ज्यामुळे तुमची सकाळ ची सुरुवात पोसिटीव्ह होणार. आणि एका सुंदर सकाळ चा अनुभव तुम्हाला मिळेल.

  • उठल्या नंतर आधी घरी असलेल्या खिडकीत किंवा दरवाज्यात उभे होऊन छान फ्रेश हवा व बाहेरून येणार प्रकाश याचा आनंद घ्या. अस केल्याने तुमाला समोरचा दिवस सुरू करण्यासाठी ऊर्जा मिळेल.

  • रोज सकाळी 2 प्याले पाणी कोमट करून प्या कोमट पाणी पिल्याने बऱ्याच रोगा पासून सुटका मिळते व त्वचा निरोगी राहणाया मदत मिळते तसेच ऍसिडिटी सारखे रोज होणारे त्रास कमी होतात ज्या मुळे तुमचा दिवस चांगला जाऊ शकतो.

  • एखादे  फळ खा फळ खाल्याने तुमच्या  बॉडी  चा मेंट्याबॉलिसम जागा होतो सोबत काही ड्राय फ्रुट घ्या या मधील व्हिटॅमिन व मिनरल आपल्या शरीरा साठी खूप चांगले असतात.

  • बाहेर निघा 20 ते 25 मिनिटे चाला, चालल्याने डिप्रेशनमध्ये सारख्या आजरा पासून सुटका मिळते आणखी चालण्याचे भरपूर फायदे असतात.

  • योगा किंवा बॉडी स्ट्रेचिंग करा 10 मिनिट साठी शांत डोळे बंद करून बसा योगा व मेडिटेशन केल्याने तुमचा शरीर व मन निरोगी असते ज्या मुळे तुम्हाला दिवसा ची सुरुवात कराला चालना मिळते.

  • ब्रेकफास्ट करा ब्रेकफास्ट हे नेहमी चांगला करा  कारण चांगला ब्रेकफास्ट तुम्हाला दिवसभराची ची ऊर्जा देतो.

  • 30 मिनिट सकाळी रोज वाचन ( Reading) करा वाचायचे खूप फायदे असतात जर तुम्ही रोज सकाळी 30 मिनिटे वाचन करत असाल तर तुम्हाला वेवसायत व नोकरीत  त्याचा भरपूर लाभ मिळणार कारण वाचन हि यशाची गुरुकुल्ली मानल्या जाते .

  • दिवस कसा घालवायचा या करिता To Do List  बनवा. तुम्हाला आज काय कार्य करायचं आहे याची यादी बनवा आणि ती सोबत ठेवा ,कार्याची यादी बनवल्याने तुमचे रोजचे काम रोज पूर्ण होतील.

मुळात अशी असाला हवी तुमची सकाळ,या सगळ्या गोष्टी केल्याने तुम्ही तुमची सकाळ सुंदर बनवू शकता आणि अश्या पद्धतीची सकाळ आयुष्यात यशशवी होण्यास महत्वाची असते.एक चांगली सकाळ तुम्हाला मनाने व शरीराने स्वस्त ठेवते आणि तुमचे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करते.

Editorial Team: Editorial Team By MarathiShout Publication
Recent Posts