समृद्धी महामार्ग करेल का समृद्ध ? ही आहेत समृद्धीची वैशिष्ट्ये. नक्की वाचा.

नागपूर- मुंबई द्रुतगती समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या ५२० किमी टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज  ११ डिसेंबर रोजी झाले. महत्वाचे म्हणजे, हा महामार्ग खुला झाल्यानंतर नागपूर ते शिर्डी अंतर १० तासांऐवजी ५ तासांत कापता येईल. अनेकांच्या आशा अपेक्षा पूर्ण करणारा समृद्धी देणारा हा महामार्ग नागपूर ते शिर्डी पर्यंत सुरू करण्यात आला आहे. 

 

हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गचे आज दिनांक नागपूर ते शिर्डी असा मार्ग आज खुला करण्यात आला आहे. आज या नागपूर ते शिर्डी या एक्स्प्रेस वे मोठ्या संख्येने स्वयंरोजगार आणि वेतन रोजगार संधी, व्यवसाय, व्यापार, शिक्षण, आरोग्य सेवा आणि इतर आवश्यक सेवांसाठी महाराष्ट्रातील मोठ्या केंद्रांवर सहज प्रवेश करण्यास सक्षम करेल. खरंतर या मार्गासाठी जर्मन टेक्नॉलॉजी वापरली गेली आहे. या महामार्गा जवळचा ११८ किलोमीटरचा पट्टा हा वनक्षेत्रातून जातो. जंगलातील प्राण्यांना या समृद्धी महामार्ग दरम्यान वन्यजीव प्राण्यांना जाता यावं किंवा यासाठी रस्त्याच्या खाली भुयारी मार्ग तयार करण्यात आले आहेत. या भूयारीवरती ध्वनिविरोधक यंत्रणा सुद्धा बसवण्यात येण्याचे सांगितले जातं आहे. जेणेकरून वन्यजीवांना कोणताही त्रास होणार नाही. 

 

खरंतर, हा एक्सप्रेस वे नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, औरंगाबाद, जालना, अहमदनगर, नाशिक आणि ठाणे या दहा जिल्ह्यांमधून जाईल. हे नागपूरला मुंबईशी जोडेल आणि देशातील सर्वात मोठ्या कंटेनर पोर्ट – जेएनपीटीशी थेट संपर्क साधेल. यामुळे राज्यातील निर्यात-आयात व्यापार वाढेल. या मार्गावरील सर्व महत्वाची शहरे आणि पर्यटन स्थळे जोडण्यासाठी आंतर-जोडणारे महामार्ग आणि फीडर रस्ते तयार केले जातील. यामुळे चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, अकोला, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, धुळे, जळगाव, पालघर आणि रायगड हे आणखी चौदा जिल्हे जोडतील. या मार्गाने महाराष्ट्रातील एकूण चोवीस जिल्हे या द्रुतगती मार्गाद्वारे जोडले जातील. असे सुद्धा सांगीतले जात आहे. सोबतच राज्यातील प्रमुख पर्यटन स्थळेसुद्धा द्रुतगती मार्गाशी जोडली जातील.

 

२२.५ मीटरच्या मध्यभागी एकूण १२० मीटर रुंदी असलेला एक्सप्रेस वे आंतरराष्ट्रीय रचनांचे पालन करेल. प्रत्येक बाजूला ८ लेन असतील. दोन्ही बाजूंनी लेन वाढवण्याची गरज भासल्यास एक्सप्रेसवेच्या मध्यभागी तरतूद केली गेली आहे. भविष्यात विस्तारीकरणासाठी यापुढे आणखी जमीन लागणार नाही. असेही सांगितले जात आहे. यास दोन्ही बाजूंनी सर्व्हिस रस्ते असतील जे अंडरपासवरून जोडले जातील.

 

समृद्धी महामार्गाची वैशिष्ट्ये

 

मुंबई ते नागपूर ८ तासांत अंतर पार करण्याचं उदिष्ट सोबतच ७०१ किमी लांबीचा महामार्ग

महामार्गासाठी ५५ हजार कोटी रुपये खर्च

१० जिल्ह्यांमधील ३९० गावांना जोडणारा महामार्ग अनेकांना रोजगार प्राप्त करून देणारा आहे. 

 

एक्स्प्रेस वेच्या संपूर्ण लांबीमध्ये विस्तृत लँडस्केपींग, बोगद्याचे प्रकाश, पुल सुशोभिकरण, सुधारित पथदिवे आणि डिजिटल संकेत वापरले जातील.

 

एक्स्प्रेस वेमधून पावसाचे पाणीही काढले जाईल. एक्स्प्रेसवेवरील प्रवेश आणि निर्गमन व्यवस्थापित केले जाईल आणि प्रवास केलेल्या अंतराच्या आधारे कमी प्रमाणात टोल आकारला जाईल.

 

एक्सप्रेस वे एक झीरो फॅटॅलिटी महामार्ग असेल; यामध्ये प्रत्येक ५ किमीवर सीसीटीव्ही पाळत ठेवणे व विनामूल्य टेलिफोन बूथ असतील जेणेकरून अपघात व आपत्कालीन परिस्थिती उद्भवू शकते.

 

एक्सप्रेस वेसह युटिलिटी महामार्ग ओएफसी केबल्स, गॅस पाइपलाइन, विजेच्या लाईन इत्यादी पुरविल्या जातील.

 

प्रिया गोमाशे: नमस्कार, मी प्रिया गोमाशे मला लेखनाची आवड असल्यामुळे विविध विषयांवर आणि घडामोडींवर लेख लिहते.
Recent Posts