अनेकांच भारतीय फौजेत भरती होण्याचं स्वप्न असत, त्यांच्यासाठी आता एक सुवर्ण संधी चालून आली आहे. तुम्ही केवळ दहावी, बारावी किंवा पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे,अशा सर्व तरुणआंसाठी भारतीय वायु सेनेत नोकरी मिळवण्याची संधी आहे. इंडियन एयरफोर्सने ग्रुप-सी च्या सिव्हिलिअन पोस्टसाठी बंपर भरती सुरू केली आहे. तर वेळ न घालवता जाणून घ्या निवड प्रक्रिये चा तपशील.
पदांची संख्या:
सीनियर कॉम्प्युटर ऑपरेटर – २ पदे
स्टोर सुपरीटेंडेंट – ६६ पदे
स्टेनोग्राफर ग्रेड 2 – ३९ पदे
लोअर डिवीजन क्लर्क (LDC) – ५३ पदे
हिन्दी टायपिस्ट – १२ पदे
स्टोर कीपर – १५ पदे
सिविलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायवर – ४९ पदे
स्वयंपाकी – १२४ पदे
पेंटर – २७ पदे
कारपेंटर – ३१ पदे
आया/ वॉर्ड सहायिका – २४ पदे
सफाई कर्मचारी – ३४५ पदे
धोबी – २४ पदे
मेस स्टाफ – १९० पदे
एमटीएस – ४०४ पदे
वल्कनाइजर – ७ पद
टेलर – ७ पदे
टिनस्मिथ – १ पद
कॉपर स्मिथ एंड शीट मेटल वर्कर – ३ पदे
फायरमन – ४२ पदे
फायर इंजन ड्रायवर – ४ पदे
फिटर (मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट) – १२ पदे
ट्रेड्समन मेट – २३ पदे
लेदर वर्कर – २ पदे
टर्नर – १ पद
वायरलेस ऑपरेटर मेकॅनिक – १ पद
एकूण पदांची संख्या – १५०८
पात्रता चे निकष?
पदांनुसार विविध प्रकारची शैक्षणिक पात्रता अनिवार्य आहे. दहावी पास ते आयटीआय कोर्स करणारे किंवा बारावी उत्तीर्ण किंवा कोणत्याही विषयातील पदवीधर उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. १८ ते २५ वर्षांपर्यंत तरुण (आरक्षित वर्गांसाठी कमाल वयोमर्यादेत नियमानुसार सवलत मिळेल) अर्ज करू शकतात. कोणत्या पदासाठी काय योग्यता हवी, याची पूर्ण माहिती पुढे दिलेल्या नोटिफिकेशन लिंक वर क्लिक करून मिळू शकेल.
निवड प्रक्रिया कशी आहे?
रिक्त पदांवर नियुक्तीसाठी लेखी परीक्षा घेण्यात येईल. या परीक्षेच्या आधारे योग्य त्या उमेदवारांची निवड केली जाईल.
अर्ज कसा करायचा?
भारतीय वायुसेनेच्या या भरतीसाठी (IAF Jobs) तुम्हाला ऑफलाइन अर्ज करायचा आहे. पुढे दिलेले नोटिफिकेशन डाऊनलोड करा. त्यात अर्ज दिला आहे. त्याची प्रिंट घ्या आणि संपूर्ण माहिती भरा, नंतर आवश्यक त्या कागदपत्रांसही कोणत्याली एअरफोर्स स्टेशनवर पाठवा. संबंधित एयरफोर्स स्टेशन वर ९ मे २०२१ च्या पूर्वी पोहोचायला हवे.
IAF group c job notification 2021 साठी येथे क्लिक करा.
Indian Air Force website (CASB) वर जाण्यासाठी येथे क्लिक करा.