डॉक्टर बनायचं आहे? तुम्ही NEET परीक्षार्थी आहात ? मग इकडे लक्ष द्या.

नॅशनल टेस्टिंग एजन्सी ने अधिकृत वेबसाइट nta.ac.in आणि ” neet.nta.nic.in ” वर NEET अधिसूचना जारी केली आहे. NEET परीक्षा १७ जुलै रोजी होणार आहे. दुपारी २ते ५:३० या वेळेत परीक्षा होणार आहे. या परीक्षेची नोंदणी सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र विद्यार्थी ६ मे रोजी रात्री  ११:५०पर्यंत या परीक्षेसाठी नोंदणी करू शकतात. दरम्यान, नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं प्रवेशपत्र जारी करण्याची तारीख जाहीर केलेली नाही. परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख ६ मे २०२२आहे.

भारतातील पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी “NEET” ही एकमेव प्रवेश परीक्षा आहे. वैद्यकीय प्रवेशासाठी इच्छुक असणारे तब्बल १५ लाखांहून अधिक विद्यार्थी दरवर्षी परीक्षेला बसतात. नॅशनल मेडिकल कमिशनने (NMC) या परीक्षेसाठी वयोमर्यादा हटवल्यानंतर, यावेळी चाचणीसाठी अर्जदारांची संख्या वाढण्याची अपेक्षा आहे.

३१ डिसेंबर २०२२ पर्यंत १७ वर्षे पूर्ण झालेले सर्व विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र आहे. २०२१ मध्ये १६,१४,७७७ विद्यार्थ्यांनी नीट-यूजी परीक्षेसाठी नोंदणी केली होती, त्यापैकी  ९५.६ टक्के विद्यार्थी परीक्षेसाठी उपस्थित होते. उपस्थित विद्यार्थ्यांपैकी  ८,७०,०७४ म्हणजे ५६.०४टक्के विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र ठरले.

आता राज्यभाषा ही NEET परीक्षेला न उपयुक्त…

परीक्षेचे आयोजन ऑफलाईन करण्यात येणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार या परीक्षेचे आयोजन 13 भाषांमध्ये केले जाणार आहे. यामध्ये इंग्रजी, हिंदी आणि उर्दू भाषेचा समावेश आहे. या शिवाय भारतात वापरल्या जाणाऱ्या आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मराठी, मल्याळम, ओडिसा, पंजाबी, तामिळ आणि तेलगु भाषेत देखील परीक्षा होणार आहे.

कसं कराल” NEET परीक्षेसाठी “रजिस्ट्रेशन नीट ?

१.सर्वात आधी आफिशिअल वेबसाईट neet.nta.nic.in वर भेट द्या.

२.वेबसाईटवर देण्यात आलेल्या Registration for NEET(UG)-2022 या लिंकवर क्लिक करा.

३.आता नाव, आई-वडिलांचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि इतर माहिती सबमिट करुन लॉग इन करा.

४.आता पुन्हा पेजवर जाऊन लॉग इन करा.

५.लॉग इन केल्यानंतर अॅप्लिकेशन फॉर्म भरा.

६.फोटो आणि तुमची सही अपलोड करा.

७.अॅप्लिकेशन फी सबमिट करा.

८.सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अॅप्लिकेशनची प्रिंट घ्या.

९. YouTube वरती ही आपल्याला हा NEET परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी मदत घेता येईल.

अश्याच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन घेण्याकरिता “मराठी shout”, Instagram आणि Facebook अकाउंट्स ला फॉलो करा, आणि उपयुक्त माहिती मिळवा.

 

 

 

 

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts