देवमाणूस मालिकेतील दिव्या सिंग आणि बज्याचा रंगला रोमँटिक डान्स.

देवमाणूस ही मालिका सध्या झी मराठी वाहिनीवरील सर्वात लोकप्रिय मालिका असलेली दिसून येत आहे. कारण, मराठी सीरिअल्सच्या टीआरपीच्या यादीत देवमाणूस ही मालिका 5व्या क्रमांकावर असून टॉप 5 मध्ये झी मराठीची ही एकमेव मालिका आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकारांनी त्यांच्या पात्राला योग्य तो न्याय दिला आहे.

मालिकेत जरी दिव्या व डॉक्टर यांचे प्रेम फुलताना दिसत असले तरी खऱ्या आयुष्यात दिव्याचा म्हणजेच अभिनेत्री नेहा खानचा बज्या सोबतचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. “बारीश की जाये” या ट्रेंडिंग गाण्यावर नेहा खान व किरण डांगे(बज्या) दोघेही रोमँटिक डान्स करताना दिसून येत आहेत. साद पावसाचे आगमन झाल्याने या दोघांना डान्स करण्याचा मोह झाला.

देवमाणूस मालिकेच्या काही फॅन्सनी मजेशीर कमेंट केलेल्या पाहायला मिळाल्या. “बज्या आता तुला 1 गोळी आणि कायमचा आराम”, “डॉक्टरला तुमचे लोकेशन पाहिजे आहे” अशा गमतीशीर कमेंट फॅन्सनी केल्या. काहीही असो या दोघांची व्हिडिओ सध्या चांगलीच व्हायरल झाली आहे.

 

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts