आपला वृद्धापकाळ कसा जाईल याचा प्रत्येक दांपत्याला विचार डोक्यात कधी ना कधी नक्किच आलेला असतो. मात्र ज्यांच्याकडे शासकीय नोकरी नाही परंतु तरीही एका वेगळ्या मार्गाने या योजनेअंतर्गत ६० वर्षांवरील लाभार्थ्यांना आता ही पेन्शन मिळू शकते. हल्ली सरकारी नोकऱ्यांमध्येही पेंशन न मिळण्याचे प्रमाण वाढते आहे. अशा परिस्थितीत निवृत्तीनंतर उदरनिर्वाह कसा करावा हा प्रश्न लोकांना पडतो. या सर्व चिंता दूर करण्यासाठी बँकेने एक नवीन योजन आणली आहे. त्यामधून तुम्हाला चांगली पेन्शन मिळू शकते. बघूयात या योजनेचे नियम.
योजना आणि नियम
सिनियर सिटाइजनस् यांना मिळणाऱ्या पेंशन योजनेचं नाव आहे रिझर्व्ह मॉर्गेज लोन स्कीम. या स्कीममध्ये घर बँकेकडे गहाण ठेवावे लागते. मात्र याचा अर्थ असा होत नाही की, बँक त्याचवेळी तुमच्या घरावर कब्जा करेल. तर घर तुमच्याकडेच राहील. मात्र त्यानंतर बँक वृद्ध दाम्पत्याला दर महिन्याला उदरनिर्वाहासाठी काही निश्चित रक्कम देत राहील. सोप्या भाषेत सांगायचं तर ही स्कीम होम लोनच्या अगदी उलट आहे. होम लोनमध्ये तुम्हाला दरमहा काही काही रक्कम जमा करावी लागते. तर या योजनेमध्ये बँक तुम्हाला दर महिन्याला पेमेंट करते.
लाभार्थी कसा असावा ?
हे कर्ज ज्यांचं वय ६० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक आहे अशा सिनियर सिटिझनना मिळते. या योजनेतून दर महिन्याला खात्यामध्ये किती रक्कम येईल, ही बाब गहाण ठेवलेल्या घराची किंमत किती आहे त्यावर अवलंबून असते. सोप्या भाषेत सांगायचं तर जर तुमच्या घराची किंमत २५ लाख रुपये असेल तर बँक दरमहा तुम्हाल ५ हजार रुपये देऊ शकते. जर तुम्हाला एकरकमी पैशांची गरज असेल तर वैद्यकीय उपचारांसाठी अशी मदत घेता येऊ शकते. उल्लेखनीय बाब म्हणजे या योजनेमध्ये कर्ज घेण्यासाठी कुठल्याही किमान उत्पन्नाच्या पुराव्याची गरज नसते.
योजनेचे भविष्यकालीन अटी
जेव्हा दाम्पत्याचा मृत्यू होतो तेव्हा बँक त्यांच्या मुलांना किंवा कायदेशीर वारसांना कर्ज जमा करण्याचा पर्याय देते. जर त्यांनी कर्जाची रक्कम जमा केली तर गहाण मालमत्ता त्यांना परत दिली जाते. मात्र कायदेशीर वारसांनी पैसे जमा केले नाहीत तर बँक घराचा लिलाव करते आणि त्यामधून वृद्धांना दिलेली रक्कम वजा करून उर्वरित रक्कम त्यांच्या वारसांना देते.