आपली हॉट अँड फिट सौन्दर्यसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री व प्रसीद्ध डान्सर हिने आपल्या आयुष्यसंबंधी एक खुलासा केला .एका लोकप्रिय कुकिंग रिअॅलिटी शो दरम्यान तिने हा खुलासा केला.
अभिनेत्री आणि नृत्यांगना नोरा फतेही हे एके काळी वेट्रेस म्हणून काम करायची,. नोरा फतेही लोकप्रिय कुकिंग रिऍलिटी शो स्टार व्हर्सेस फूडमध्ये दिसली होती. येथे नोरा फतेहीने तिच्या करिअरशी संबंधित एक मोठा खुलासा केला. नोराने सांगितले की, एक काळ होता जेव्हा ती वेट्रेस म्हणून काम करायची.
नोरा म्हणाली- वेट्रेस असणे खूप कठीण आहे. नोरा फतेहीने सांगितले की, ती महाविद्यालयीन जीवनात असताना ती कॅनडामध्ये वेट्रेस म्हणून काम करायची.तिने वयाच्या अगदी 16व्या वर्षापासून 18 वर्षे वेट्रेस म्हणून काम केले. नोरा म्हणाली- वेट्रेस असणे खूप कठीण आहे.नोरा हिने हे काम अतिशय आव्हानात्मक असल्याचे म्हटले. यासाठी तुम्हाला जलद असायला हवे तसेच तुमची संवाद कौशल्य, व्यक्तिमत्व, चांगली स्मरणशक्ती असणे अत्यंत आवश्यक असते .कधीकधी ग्राहक कसाही वागू शकतो, म्हणून ती परिस्थिती कशी हाताळावी हे आपल्याला चांगल्यारितीने माहित असायला पाहिजे.
पण ते काम अर्धवेळ होते ज्यातून मी पैसे कमवत असे . मला वाटते की, ही कॅनडाची संस्कृती आहे. प्रत्येकाला तिथे काम मिळते. तुम्ही शिकत असताना देखील काम करू शकता,
नोरा हि तिच्या फिटनेससाठी व सोंदर्यसाठी ओळखली जाते. शोमध्ये नोरा यांनी स्वतःला फिट ठेवण्याचे काही टिप्स सांगितले. नोराने अशे म्हटले कि ती ज्या संस्कृतीतून आले आहे, जिथे सडपातळ असणे चांगले मानले जात नाही. शरीराला आकार आणि जाडीला प्राधान्य दिले जाते. नोराने म्हटले माझ्यासाठी, मी नेहमीच जाड आणि वक्र बनण्याचा प्रयत्न करते. मला वजन वाढवायचे आहे. ही आपली सांस्कृतिक मानसिकता आहे, म्हणूनच आपण सतत खात असतो.
नोराने सांगितले कि ती ‘सत्यमेव जयते – 2’ मध्ये एक खास डान्स नंबर करताना दिसणार आहे. पहिल्या भागात नोराने दिलबर या गाण्यावर धमाल केली होती. या गाण्यामुळे नोराची लोकप्रियता वाढली नोरा ने अलीकडेच अजय देवगणच्या ‘भुज – द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटात काम केलं