अरेच्या ! चुकून दुसऱ्यांच्या बँक खात्यात पैसे गेले ? आता परत कसे मागाल ?

सध्याचा काळ हा ऑनलाइन व्यवहाराचा आहे. ऑनलाइन बँकिंग व्यवहार करतांना आपण सगळेच सजग असतो. ऑनलाइन बँकिंग व्यवहार करतांना आपण पैसे देखील दुसऱ्यांना अधूनमधून पाठवत असतो. खरंतर आता यूपीआय अथवा नेट बँकिंगच्या माध्यमातून मनी ट्रांजॅक्शन म्हणजे पैशांची देवाणघेवाण करणे खूप सोपे झाले आहे. UPI च्या माध्यमातून काही सेकंदात तुम्ही कोणाच्याही अकाउंटवर अथवा मोबाइल नंबरवर पैसे ट्रान्सफर करु शकता. ही सेवा मोफत आहे. पण पैसे ट्रान्सफर करताना एक छोटी चूक झाली तर त्याचा मोठा आर्थिक फटका बसू शकतो. अनेकवेळा या समस्येला लोकांना सामोरे जावे लागते. कधीकधी मनी ट्रांजॅक्शन दरम्यान पैसे चुकीच्या अकाउंटवर जातात. या पार्श्वभूमीवर आरबीआयने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार २४ तासांच्या आत चुकीने ट्रान्सफर झालेले पैसे तुम्ही परत मिळवू शकता.

 

तक्रार कशी कराल?

 

अनेक बँकिंग ॲप, आपण आर्थिक व्यवहार करतांना पैसे जमा आणि पैसे कट झाल्याचे पुराव्याच्या स्वरूपात मेसेज पाठवत असते. UPI transactions अथवा नेट बँकिंग केल्यानंतर स्मार्टफोनवर जो मेसेज येतो ते सेव्ह करुन ठेवा. तो डिलीट करु नका. हा मेसेज PPBL नंबर असतो. पैसे रिफंड मिळवण्यासाठी या नंबरची गरज पडते. RBI ने याबाबत जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये म्हटले आहे की जर का चुकीने कोणाच्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर झाले तर बँकेत जाऊन लेखी तक्रार नोंदवू शकता. त्यासोबतच चुकून त्यांच्या खत्यात जमा झालेले पैसे यांची प्रत काढून बँकेत द्यायला हवे. त्यात तुम्हाला अकाउंट नंबर, नाव तसेच ज्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर झाले आहेत त्याची माहिती द्यावी.

 

आता कोणतीही तक्रार नोंदवल्यानंतर थोडा वेळ हा लागतोच. अर्थात, चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाले असतील तर रक्कम परत मिळण्यास काही दिवस लागू शकतात. या प्रकाराबाबत बॅंकेच्या शाखा व्यवस्थापकास (Branch Manager) माहिती द्यावी. कारण, कोणत्या शहरातल्या कोणत्या बँकेच्या शाखेतल्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर झाले आहेत, याची माहिती तुम्हाला तुमच्या बॅंकेकडूनच मिळू शकते. तुमची बॅंक संबंधित शाखेशी संपर्क साधून तुमचे पैसे परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करते. तुमच्या माहितीच्या आधारे बॅंक ज्या खात्यावर चुकून पैसे ट्रान्सफर झाले आहेत त्या व्यक्तीला कळवेल. यानंतर, बॅंक त्या व्यक्तीला चुकीच्या पद्धतीनं ट्रान्सफर झालेली रक्कम परत देण्याबाबत विनंती करेल.

 

ज्या खात्यात रक्कम चुकून ट्रान्सफर झाली आहे, तो खातेधारक रक्कम परत करण्यास नकार देत असेल तर त्याच्या विरुद्ध न्यायालयात खटला दाखल करता येतो. तथापि, पैसे परत न केल्यास हा अधिकार रिझर्व्ह बॅंकेच्या नियमांचं उल्लंघन ठरतो. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, लाभार्थ्याच्या खात्याबद्दल योग्य माहिती देणं ही लिंक करणाऱ्याची जबाबदारी असते. कोणत्याही कारणास्तव लिंक करणाऱ्यानं चूक केली असेल तर त्याला बॅंक जबाबदार राहत नाही. त्यामुळे खाते क्रमांक योग्य टाकणं ही संबंधित ग्राहकाची जबाबदारी असते.

प्रिया गोमाशे: नमस्कार, मी प्रिया गोमाशे मला लेखनाची आवड असल्यामुळे विविध विषयांवर आणि घडामोडींवर लेख लिहते.
Recent Posts