अरेच्या..!! या भाजीची किंमत तब्बल एक लाख रुपये. विश्वासच बसेना.

भारतात अनेक भाज्यांचे उत्पादन केले जाते शिवाय हिवाळ्यात हिरव्या पालेभाज्यांना प्रतिसाद देणारे अनेक ग्राहक तुम्हाला बाजारात खरेदी करताना दिसतील परंतु त्यामधूनच एक सगळ्यात महागडी आणि दुर्मिळ अशी भाजी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्या भाजीची किंमत ऐकून तुम्हाला खरंच आश्चर्य वाटेल. द गार्डियनच्या वृत्तानुसार, हॉप शूट्सच्या वनस्पतीपासून मिळणारी भाजी ८५ हजार ते १ लाख रुपये प्रति किलो दराने विकली जाते. एक किलो भाजीची किंमत जवळपास ८५ हजार रुपये आहे…. हे ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल ना…हॉप शूट्सच्या फुलांचा वापर मादक द्रव्य बनवण्यासाठी केला जातो. जसे की वाईन. आणि वाईन घेणारे परदेशी रहिवासी जास्त आहेत. 

 

उत्तर अमेरिका, युरेशिया आणि दक्षिण अमेरिकेत हॉप्सचे पीक घेतले जाते. उष्णकटिबंधीय हवामानासाठी योग्य, ही वनस्पती भारतात लागवड करता येत नाही. मात्र, भारतात काही शेतकऱ्यांनी या भाजीपाल्याची लागवड करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही. परंतु ही एक सदाहरित भाजी आहे. या भाजीला वडीला हिवाळ्याचे वातावरण म्हणजेच थंडी भावत नाही त्यामुळे मार्च ते जून या कालावधीमध्ये जास्तीत जास्त या भाजीचे उत्पन्न घेतल्या जाते. या वनस्पती खूप झपाट्याने वाढतात सांगायचे झाल्यास साधारणतः एका दिवसात या वनस्पतीचे डहाळे जवळपास सहा इंच एवढे वाढतात. 

 

हॉप शूट्सची वनस्पती औषधी गुणधर्मांनी समृद्ध मानली जाते. चिंता, निद्रानाश, अस्वस्थता, तणाव, उत्साह, अटेंशन डेफिसिट-हायपरएक्टिव्हिटी डिसऑर्डर, चिंताग्रस्तपणा आणि चिडचिड यांवरही या भाजीचे सेवन फायदेशीर ठरते. यासोबतच ही भाजी कॅन्सरशी लढण्यासही सक्षम आहे. महत्वाचं म्हणजे वर्षभर या भाजीचे उत्पादन घेता येऊ शकतं. पण मार्च ते जून हा कालावधी सर्वाधिक चांगला मानला जातोय. जास्त थंड असेल तर या भाजीच्या उत्पादनावर परिणाम होतो. या भाजीच्या उत्पादनासाठी चांगली करदार जमीन आवश्यक आहे. असं म्हटलं जातं की, या भाजीचा उपयोग शरीरातील कॅन्सरस सेल्स मारण्यासाठी होतो. त्यासाठी ही भाजी चांगल्या प्रकारे काम करते.

 

हॉप शूटमध्ये शंकूच्या आकाराची फुले येतात. त्यात स्ट्रोबाइल असते. याचा वापर बिअरच्या गोडव्याला संतुलित करण्यासाठी केला जातो. हॉप शूट्सच्या वनस्पती ओळींमध्ये वाढत नाहीत. त्यांची कापणी करण्यासाठी काही मेहनत करावी लागते. एक महत्त्वाचे म्हणजे, ही भाजी तुम्हाला कोणत्याही बाजारात किंवा व्हेजिटेबल स्टोअर मध्ये क्वचितच दिसेल आणि याचे कारण म्हणजे या भाजीचा वापर बिअरमध्ये जास्त केला जातो.

 

‘हॉप शूट्स’ही कच्चे खाल्ले जातात. मात्र, त्याची चव कडू असते. त्यापासून लोणचेही बनवले जाते. द गार्डियनच्या वृत्तानुसार, एवढी महाग भाजी असतानाही ब्रिटनसह अनेक देशांमध्ये ती टाकाऊ म्हणून गणली जाते.

 

या वनस्पतीची भाजी तयार होण्यासाठी तीन वर्षे लागतात. वनस्पतीमध्ये लहान, नाजूक हिरवे सिरे असतात. ते काढण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. त्याची काळजी घेणे खूप मेहनतीचे काम आहे. यामुळेच हॉप शूट्सच्या भाजीची किंमत खूप जास्त आहे.

प्रिया गोमाशे: नमस्कार, मी प्रिया गोमाशे मला लेखनाची आवड असल्यामुळे विविध विषयांवर आणि घडामोडींवर लेख लिहते.
Recent Posts