पॅरिस
फ्रान्सचे अब्जाधीश आणि संसद सदस्य ओलिवियर दसॉल्ट यांचा मृत्यू झाला आहे. फ्रान्सचे राष्ट्रपती इम्यनुएल मॅक्रॉन यांनी ट्विट करुन यासंबंधीची माहिती दिली आहे एका हॅलीकॉप्टर दुर्घटनेत ओलिवियर दसॉल्ट यांचा मृत्यू झाला.
ओलिवियर 2002 मध्ये रिपब्लिक पक्षाचे आमदार होते. त्यांना दोन भाऊ आणि एक बहीण आहे. ते परिवाराचे उत्तराधिकारी होते. त्यांचे आजोबा मार्सेल एक वैमानिक इंजिनियर आणि प्रतिष्ठित शोधकर्ता होते. त्यांनी पहिल्या महायुद्धात फ्रान्सच्या विमानामध्ये वापरले जाणारे एक प्रोपेलर विकसित केले होते. ते आज जगभरात प्रसिद्ध आहे.
दसॉल्ट 69 वर्षाचे होते. ते फ्रान्सचे अब्जाधीश सर्ज दसॉल्ट यांचे सर्वात मोठे पुत्र होते. दसॉल्ट ग्रुप युद्ध विमानांचे निर्माण करते, शिवाय ग्रुपचे फिगारो नावाचे एक वृत्तपत्रही आहे. मॅक्रोन यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय की, ओलिवियर दसॉल्ट फ्रान्सवर प्रेम करायचे. त्यांनी उद्योग, कायदे निर्माण, निवडणूक अधिकारी, वायु सेना कमांडर म्हणून देशाची सेवा केली आहे. त्यांचे असे अचानक जाणे देशासाठी मोठी हानी आहे. स्थानिक माध्यमांनी यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.