वेळ गेलेली नाही आताच हृदयाकडे लक्ष द्या,आणि असे वागणे टाळा !

हार्ट अटॅक एक आरोग्याची अशी स्थिती आहे. ज्यामध्ये तुमच्या जीवनशैलीचा खूप मोठा परिणाम तुमच्या आरोग्यावर होत असतो. यामध्ये तुमचा आहार, वय, व्यायाम, वजन, मानसिक ताण-तणाव, पर्यावरण, विचार, प्रदूषण यासारख्या गोष्टींचा समावेश होतो.

सध्याच्या धावपळीच्या जीवनात आपलं आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. अशावेळी काही महत्वाचे बदल केल्यास तुम्हा हृदयविकाराच्या झटक्यापासून दूर राहू शकता. कोलकातामधील नजरूल मंचावर लाइव्ह परफॉर्मन्स केल्यानंतर केकेला हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण यामध्ये त्यांच निधन झालं.केकेच्या जाण्यावर प्रत्येकानेच हळहळ व्यक्त केली आहे. अशाप्रकारे एखाद्या व्यक्तीचं जाणं हे धक्कादायकच आहे. अशावेळी आपण आपल्या आरोग्याची किती काळजी घ्यायला हवी याची जाणीव प्रत्येकालाच झाली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच म्हणणं आहे की, जे लोक अपुरेपणे सक्रिय आहेत त्यांना हृदयविकाराच्या झटक्याने मरण्याचा धोका शारीरिकरित्या सक्रिय नसलेल्या लोकांच्या तुलनेत २० ते ३० टक्के वाढतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनने जारी केलेल्या सर्वात अलीकडील अंदाजानुसार, आठवड्यातून ३५-४० तास काम करण्याच्या तुलनेत, दर आठवड्याला ५५ किंवा अधिक तास काम केल्याने धोका वाढतो. अधिक काम करणाऱ्यांना स्ट्रोकचा धोका अंदाजे ३५% जास्त आणि इस्केमिक हृदयरोगामुळे मृत्यू होण्याचा धोका १७ टक्क्याने वाढला आहे.

व्यायामाला सुरुवात करा,आणि हृदयरोग निवारण करा !

न्यूयॉर्कच्या डिपार्टमेंट ऑफ हेल्थच्या म्हणण्यानुसार, असा अंदाज वर्तवला जातो की, जवळपास ३५ टक्के कोरोनरी हार्ट डिजीजमुळे मृत्यमूखी पडणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. हे लोक शारीरिक स्वरुपात असक्रिय असतात. म्हणजे व्यायाम, योगा सारख्या गोष्टींमुळे शारीरिक रुपाने ऍक्टिव असणं गरजेचं असतं. जगभरात एकूण ६० टक्के लोक शारीरिक रुपाने अस्क्रिय असतात. कोणताही व्यायाम ते करताना दिसत नाही. कोरोनरी हार्टमुळे अमेरिकेत दरवर्षी ७ लाख लोकांचा मृत्यू होतो.

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts