OnePlus च्या या स्मार्टफोनवर मिळवा तब्बल 3,000 रुपयांचा डिस्काउंट !

OnePlus ने नुकताच OnePlus 10T 5G  च्या 16GB RAM असलेल्या व्हेरियंट फोन सेलसाठी उपलब्ध केलाआहे. हा स्मार्टफोन तुम्ही Amazon आणि OnePlus च्या ऑफिशिअल स्टोरमधून खरेदी करु शकता. चला तर मग जाणून घेऊ OnePlus 10T या स्मार्टफोनचे फिचर्स :-

OnePlus 10T चा डिस्प्ले

OnePlus 10T 5G या हा स्मार्टफोन 6.7 इंच आहे डिस्प्ले Fluid AMOLED हा आहे. या स्मार्टफोनचा डिस्प्ले 120 Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. तसेच हा डिस्प्ले Corning Gorilla Glass च्या प्रोटेक्शनसोबत तुम्हाला मिळणार . या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला इन-फोन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर मिळणार.

डिस्प्लेचं एकूण resolution 2412 X 1080 पिक्सल आहे आणि HDR 10+, sRGB, Display P3, 10-bit कलर डेप्थला देखील सपोर्ट करतो.

OnePlus 10T चा परफॉर्मंस

OnePlus च्या या स्मार्टफोनचा प्रोसेसर Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 सपोर्ट करतो. तसेच 16GB पर्यंत RAM आणि 256GB चं इंटरनल स्टोरेज तुम्हाला या फोनमध्ये मिळणार . या फोनची बॅटरी 4,800mAh इतकी आहे आणि 150W फास्ट चार्जिंग फीचर आहे. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला Android 12 वर आधारित असेलेला OxygenOS मिळणार.

OnePlus 10T चा कॅमेरा Setup

 

OnePlus 10T 5G मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यास्मार्टफोनचा प्रायमरी कॅमेरा 50MP इतका असून फोनच्या मागच्या बाजूस 8MP अल्ट्रा वाईड कॅमेरा आणि 2MP मायक्रो लेंस उपलब्ध आहे. या फोनमध्ये विशेष सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी  16MP चा पंच-होल कॅमेरा मिळतोय.

OnePlus 10T ची किंमत | OnePlus 10T 5G price details

OnePlus 10T हा स्मार्टफोन 8GB RAM + 128GB, 12GB RAM + 256GB आणि 16GB RAM + 256GB या तीन स्टोरेज व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. या हँडसेट च्या बेस व्हेरियंटची किंमत 49,999 रुपये आहे. तसेच , याचे इतर दोन व्हेरियंट 54,999 रुपये आणि 55,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहेत. हा स्मार्टफोन्सला Jade Green आणि Moonstone Black या कलर्समध्ये उपलब्ध आहे.

OnePlus 10T ची ऑफर

हा स्मार्टफोन SBI कार्डद्वारे खरेदी केल्यावर 3,000 रुपयांचा इंस्टंट डिस्काउंट ऑफर मिळतो आहे. तसेच , Kotak बँक आणि Standard Chartered बँकच्या क्रेडिट कार्डद्वारे स्मार्टफोन खरेदी केल्यास 1500 रुपये किंवा 10 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळतो आहे. जर तुम्हाला हा या स्मार्टफोन EMI नुसार खरेदी करायचा असल्यास तुम्हाला No COST EMI सुविधा मिळेल. हा स्मार्टफोन 2,354 रुपयांच्या EMI मध्ये देखील विकत घेता येतो.

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts