ऑनलाईन शॉपिंग करायची आणि सोबत बचत ही करायची मग करा हे उपाय.

ई-कॉमर्स कंपन्या ग्राहकांसाठी आकर्षक सेल आणि ऑफर्स आणत असतात. नियमित बाजाराच्या तुलनेत ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर आकर्षक डिस्काउंट मिळत असते. त्यामुळे ग्राहक देखील ऑनलाइनच शॉपिंग करण्याला प्राधान्य देतात. ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवर डिस्काउंट, एक्सचेंज ऑफर्स, बँक ऑफर्स, कूपन कोडचा फायदा मिळतो. आज स्मार्टफोनच्या एका क्लिकवर सहज अनेक गोष्टी करणे शक्य आहे. स्मार्टफोनच्या मदतीने तुम्ही घरबसल्या कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह अनेक गोष्टी खरेदी करू शकता. “मराठी Shout” तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने ऑनलाइन शॉपिंग करताना तुमची मोठी बचत होईल. याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

१.सगळ्यात प्रथम हे करा.

प्रोडक्ट्सची करा तुलना, YouTube , गुगल यांसारख्यानच्या मदतीने प्रॉडक्ट compair करा,तुम्ही जर एखाद्या प्रोडक्टला ऑनलाइन खरेदी करत असाल तर अशा स्थितीमध्ये त्या प्रोडक्टला इतर प्रोडक्टशी कंपेअर करायला हवे. तुम्ही त्या प्रोडक्ट्सच्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची तुलना करू शकता. जर तुम्हाला दुसऱ्या प्रोडक्टचे स्पेसिफिकेशन्स आणि किंमत चांगले वाटत असल्यास तुम्ही ते खरेदी करू शकता. अशाप्रकारे तुमची मोठी बचत होईल.

२.सुट्टी च्या दिवशी शॉपिंग करणे हमखास टाळा.

अनेकजण आठवड्याच्या शेवटी, सुट्टी असताना शॉपिंग करतात. तुम्ही देखील वीक डेजवर शॉपिंग करत असाल, तर असे करणे टाळा. वीक डेजवर अनेक प्रोडक्ट्सच्या किंमतीत वाढ होते. त्यामुळे वर्किंग डेजवर शॉपिंग करायला हवी. वर्किंड डेजवर शॉपिंग केल्यास तुम्हाला वस्तूवर आकर्षक ऑफर्सचा फायदा मिळेल.

३.प्रत्येक महिन्यात येणाऱ्या फेस्टिवल सेल्सची बघा वाट, आणि भरघोस कमी किंमतीत वस्तू घ्या.

तुम्ही जर एखादी महागडी वस्तू ऑनलान खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ई-कॉमर्स वेबसाइटवर आयोजित केल्या जाणाऱ्या सेल्सची वाट पाहा. सेल्समध्ये अनेक प्रोडक्ट्सवर आकर्षक ऑफर्सचा फायदा मिळतो. त्यामुळे सेल्स दरम्यान शॉपिंग करताना तुमची शेकडो रुपयांची बचत होईल. ई-कॉमर्स वेबसाइटवर दर आठवड्याला नवनवीन सेलचे आयोजन केले जाते.

४. हमखास वापरा हे ” कूपन कोड्स” आणि बचत करा.

आपण वापरत असलेले अनेक मनी ट्रान्स्फर करणारे ॲप्स आपल्याला अनेक वेळा गिफ्ट व्हाउचर देतात त्याही वापरून तुम्ही आपले पैसे वाचवू शकता. आपण वापरत असलेले डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड ही आपल्याला अनेक वेळा आपल्याला वस्तू ऑनलाईन घेताना पैसे कमी करून देऊ शकतात त्यांच्याही ऑफर्स वरती लक्ष द्या.

५.आपल्या घराजवळील दुकाने, शो रूम्स ला भेट द्या.

अनेक वेळा आपल्याला, आपले खात्रीचे सामान आपल्याला स्पर्श करून पाहता येते. दुकानातून जर आपण वस्तू घेतली तर आपल्या वस्तूची सगळी जिम्मेदारी दुकान मालक घेतात. काही बिघाड झाल्यास दुकनदारांकडून आपल्याला मदत होते. पण घेतलेल्या वस्तूचे बिल्स, रसिद बरोबर ठेवा.

वस्तू घेतांना योग्य ऑफिशीयल/खरी साईट आहे ही खात्री करा. जमत नसल्यास ऑनलाईन शॉपिंग साठी  मदत घ्या. क्रेडिट कार्ड किंवा इतर माहिती सहज न दीलेलीच बरी. पण जर तुम्हाला वस्तू घेतल्यावर नको आहे, किंवा ती आपल्यापर्यंत बरोबर आलेली नाही असे वाटल्यास आपल्याला ती वस्तू जर आपण ऑफिशीयल  साईट वरून घेतली असेल तर पैसे परत मिळतात किंवा एक्सचेंज पण करता येते ही बाब लक्षात घ्या, असे आवाहन मराठी Shout ची टीम करत आहे.

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts