Oppo Reno वर मिळतोय जबरदस्त डिस्काउंट, जाणून घ्या ‘हे ‘ यूनिक फीचर्स !

तुम्ही जर नवीन स्मार्टफोन घ्यायचा विचार करत असाल तर Oppo Reno ठरु शकेल तुमचा बेस्ट पर्याय. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोनच्या फीचर्सबद्दल :-

Oppo Reno features: –

 

Oppo Reno 8 Pro 5G Display

Oppo Reno हा 5G स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा फुल HD + AMOLED मध्ये . याचे पिक्सेल रेझोल्यूशन 2412×1080, आस्पेक्ट रेशो 20.1:9, रिफ्रेश रेट 120Hz, स्क्रीन टू बॉडी रेशो 93.4 टक्के आणि पीक ब्राइटनेस 950nits आहे. हा स्मार्टफोन 2 कलर ऑप्शनमध्ये उपलबध आहे . यात ग्लेझ्ड ब्लॅक आणि ग्लेझ्ड ग्रीनचा समावेश आहे.

Oppo Reno 8 5G Camera

Oppo Reno या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा मिळेल , मागील बाजूस 50MP मुख्य कॅमेरा, 8MP अल्ट्रा-वाइड अँगल सेन्सर आणि 2MP मॅक्रो लेन्स पॅक आहेत. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंग साठी समोर 32MP कॅमेरा दिला आहे. यात 2 रियर एलईडी फ्लॅश आहे आणि पॅनोरॅमिक, पोर्ट्रेट, नाईट, टाइमलॅप्स, स्टिकर आणि ड्युअल यासारख्या अनेक कॅमेरा वैशिष्ट्यांसह हा फोन सुसज्ज आहे.

Oppo Reno 8 5G Specification

या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज मिळेल . यात मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज वाढवता येऊ शकतं तसेच या फोनमध्ये Mediatek Dimensity 8100 Max प्रोसेसर देण्यात आला आहे असून यात तुम्हाला Android 12 वर OS मिळेल.

Oppo Reno 8 5G Battery

Oppo Reno 8 5G मध्ये 4500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन 80W SUPERVOOC ला सपोर्ट करतो. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट असून फोन अनलॉक करण्यासाठी फेस अनलॉक सारखे फीचर्स देखील देण्यात आले आहे. याशिवाय हा फोन कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ v5.3 आणि USB Type-C इत्यादी पर्याय सपोर्ट करतो.

Oppo Reno 8 5G Price and Offer

Oppo Reno ची किंमत 45999 रुपये आहे. जर तुम्ही हा फोन ई-कॉमर्स वेबसाइटवर खरेदी केल्यास तुम्हाला 4000 रुपयांची सूट मिळेल. मात्र सध्या ही ऑफर निवडक बँक कार्डांवर लागू आहे, ज्यात SBI आणि बडोदा बँकचा समावेश आहे. या फोनवर 17000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफरही दिली जात आहे. हा स्मार्टफोन तुम्ही ईएमआय पर्याय वापरूनसुद्धा खरेदी करू शकता.

 

 

 

 

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts