“नॉन रिब्रिथिंग मास्क” वापरून कमी ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढणे शक्य.

राज्यात सध्या ऑक्सिजन तुटवड्याबाबत रोज बातम्या पाहतो. दुर्दैवाने यात ऑक्सिजन अभावी अनेकांचे जीवही जात आहेत. अशावेळी पंढरपूरच्या उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. अरविंद गिराम यांनी सुरु केलेल्या नॉन रिब्रिथिंग मास्कमुळे या हॉस्पिटलचा ऑक्सिजनचा प्रश्न सुटला आहे. कोविड रुग्णांना लावण्यात येणाऱ्या ऑक्सिजन मास्कच्या ऐवजी हा नॉन रिब्रिथिंग मास्क वापरल्याने रुग्णांना पुरेसा ऑक्सिजन मिळून ऑक्सिजनची 50 टक्क्यापर्यंत बचत होऊ लागली आहे. हा प्रयोग राज्यातील इतर ठिकाणी केल्यास ऑक्सिजन तुटवड्यावर हा रामबाण इलाज ठरणार असून यामुळे ऑक्सिजन अभावी जाणाऱ्या अनेकांचे प्राणही वाचणार आहेत.

“नॉन रिब्रिथिंग मास्क” म्हणजे नेमके काय?

रूग्णांना सामान्यतः पाईप अथवा मास्कच्या माध्यमातून ऑक्सिजनचा पुरवठा होतो. असा ऑक्सिजन पुरवठा रूग्णांना होत असताना. रूग्णाने मिळालेल्या ऑक्सिजनच्या आधारे श्वास घेउन उश्वास बाहेर सोडत असताना संबधित शरीरातील कार्बन डायऑक्साईड नव्याने येणाऱ्या ऑक्सिजनमध्ये मिसळला जातो. त्यामुळे एकंदर मानवी शरीरास कृत्रिम ऑक्सिजनमधून एकूण क्षमतेच्या 30 टक्केच ऑक्सिजन मिळतो. परिणामी ऑक्सिजनची मागणी अधिक वाढते.

नॉन रिब्रिथिंग मास्कमध्ये व्हॉल्व असणाऱ्या मास्कसोबत रिझरव्हायर बॅग जोडली आहे. यामुळे कृत्रिम ऑक्सिजनचा साठा बॅगमध्ये होऊन यातून रूग्णास 80 टक्यांहून अधिकचा ऑक्सिजन मिळण्यास मदत होते. यामध्ये रूग्णांने श्वास घेतल्यानंतर उच्छावासावाटे बाहेर पडणारा कार्बन डायऑक्साईड व्हॉल्वच्या माध्यमातून बाहेर पडतो. त्यामुळे शुध्द आणि क्षमतेएवढाच ऑक्सिजन रिझरव्हायर बॅगमधून रूग्णास मिळतो. संबधित रिझरव्हायर बॅगमुळे ऑक्सिजनची साठवणूक होऊन यातून ऑक्सिजनची बचतही होण्यास सुरूवात होते.

रिझरव्हायर बॅगमुळे रूग्णांना जास्तीचा कृत्रिम ऑक्सिजन मिळतो. त्यामुळे रूग्णांची श्वसनक्रिया लवकर व्यवस्थित होण्यास मदत होते. या बॅगेमुळे रूग्णांचा रुग्णांची रिकव्हरी देखील लवकर होण्यास मदत होते आहे.
मात्र, हा मास्क खूप मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची बचत करीत असला तरी याचा वापर करताना ऑक्सिजनचा पुरवठा अखंडित होणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

दिल्ली, युपी येथेही हा उपाय करावा:

महाराष्ट्र बाहेरील अनेक दुसऱ्या राज्यातली शहरे सध्या ऑक्सिजचा तुटवड्यात आहेत. रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी दुसऱ्या राज्यांनीही हा “नॉन रिब्रिथिंग मास्क” प्रयोग यशस्वी करायला हवा, ज्यामुळे ऑक्सिजचा पुरेपूर वापर होऊन मृत्यू होत असलेला रुग्णांचा आलेख कमी करण्यास मदत होईल. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा युपी सारखे राज्य त्यांच्या अपुऱ्या असणाऱ्या आरोग्य सेवेविषयी सत्य बोलतील.

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts