अनेकांना पान खाण्याचा शौक असतो,त्यात अनेकांची पसंदी पण वेगवेगळी असते. कोणाला मीठा, कोणाला सादा ते कोनी सुपारी आणि तंबाखू पण पानात टाकून खातात. आपल्या कडे तर पानाला एक भोजन पाचक म्हणूनही मान्यता मिळाली आहे. आयुर्वेदातही खायचे पान या विषयावर लेख सापडतात.
दिल्ली येथील एका दुकानात सोन लावलेला पान मिळत आहे. त्यात अनेक सामग्री टाकली असते प्रामुख्याने सुख खजूर, विलायची, लवंग,गोड चटणी, गुलकंद, आणि चेरी इत्यादी यांचा मेळ आहे. यानंतर या पानात सोन्याचा वर्ख लावण्यात येतो आणि चेरी भूर्कवून गारनिशिंग केली जाते. तुम्ही सुद्धा हा चविष्ट पान दिल्ली स्तिथ ‘यमुस पंचायत, कंनॉट प्लेस’ येथे जाऊन खाऊ शकता.
पानाचे पैसे एकूण नेटकरी हैरान
काही नेटकऱ्यानी या पानावर भरपूर टीका केली आहे,परंतु अनेक लोक या पानाची चव चाखण्यासाठी उत्सुक आहेत. आपले काय मत आहे या पानावरती आम्हाला कळवा .आणि अश्याच अतरंगी बातम्या वाचण्यासाठी मराठी shout ला फॉलो करा.