पाकिस्तानी क्रिकेटर हसन अलीची भारतीय पत्नी आहे तरी कोण ? गुप्तहेर म्हणून केलं जातंय ट्रोल

टी-20 विश्‍वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवत पाकिस्तानच्या विजयी मोहिमेला ‘ब्रेक’ लावला.पाकिस्तानचे टी-20 विश्‍वचषक जिंकण्याचे स्वप्न अधुरे राहिले. 

सामन्याच्या १९ व्या षटकात मॅथ्यू वेडची कॅच हसन आली ने सोडली आणि हा  सामन्याचा ‘टर्निंग पॉईंट’ ठरला. त्यानंतर वेडने सलग ३ षटकार ठोकत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. तेव्हापासून पाकिस्तानी चाहत्यानी हसन अलीवर (Hasan Ali) पराभवाचे खापर फोडले  आहेत. 

सोशल मीडियावर आणि टीव्ही मीडिया वर हसन आली ला  जोरदार ट्रोल केले जात आहे. हसन अलीसह त्याच्या पत्नीवरदेखील वैयक्तिक पातळीवर टीका केली जात आहे त्याचे प्रमुख कारण  म्हणजे हसन अलीची पत्नी  पत्नी भारतीय आहे. हा मुद्दा उपस्थित करुन हसनच्या पत्नीवर भारताची गुप्तहेर असल्याचा आरोपदेखील केले जात  आहे. जाणू या हसन अलीची पत्नी  आहे तरी कोण…

हसन अलीच्या (Hasan Ali) पत्नीचे नाव शामिया आरजू (Samiya Arzoo) आहे . टी-20 विश्‍वचषक स्पर्धेत भारत पाकिस्तानकडून हारल्यानंतर विराट कोहली आणि मोहम्मद शमीला ट्रोल केले होते त्याचप्रमाणे पाकिस्तान उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाकडून हारल्यानंतर हसन अली आणि त्याच्या कुटुंबियातील लोकांना ट्रोल केले जात आहे. 

यावर पाकिस्तानच्या काही माजी क्रिकेटरने जोरदार आक्षेप घेतला आहे. पाकिस्तानचे माजी क्रिकेटर वसीम अकरमने म्हटले आहे की, लोकांकडून अशाप्रकारच्या घाणेरड्या प्रतिक्रियांची अपेक्षा नव्हती त्यांनी खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबियांतील व्यक्तींवर होणाऱ्या आक्षेपार्ह टीकेवर जोरदार प्रत्युत्तर दिले. 

कोण आहे हसन अलीची पत्नी?

 

हसन अलीची पत्नी शामिया आरजू (Samiya Arzoo) ही मूळची भारतीय आहे. २० डिसेंबर २०१९ मध्ये तिने हसन अलीसोबत दुबईतील ऐका हॉटेलमध्ये  लग्न केले. या लग्न सोहळ्यादरम्यान  दोन्ही परिवारातील जवळचे नातेवाईक उपस्थित होते.  

शामियाने हसन अलीसोबत लग्न केले असले तरी तिचा  आ‍वडता खेळाडू मात्र विराट कोहली आहे. शामियाने हसन अलीशी लग्न केले होते त्यावेळी हसनची क्रिकेट कारकिर्द बहरली होती.एवढच नव्हे तर  हसन अलीची  तुलना ही पाकिस्तानच्या महान गोलंदाज वसीम अकरमशी करण्यात आली होती. 

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts