आता खाण्याच्या तेलाचेही वांदे होणार ? महागाईला द्या आता पाण्याची फोडणी !!!

पामतेलाच्या निर्यातीच्या बंदीचा निर्णय घोषित करतानाच इंडोनेशियाने त्यापुढे जात सर्वच प्रकारच्या खाद्यतेलांच्या निर्यातीवर बंदी जाहीर केली आहे. देशातील खाद्यतेलाच्या टांचाईशी मुकाबला करण्यासाठी आपण हा निर्णय घेत असल्याचे इंडोनेशियाने जाहीर केले आहे. यामुळे पामतेलाचे वायदे सोमवारी ७ टक्के वधारले. त्याचवेळी इंडोनेशियातील पामतेलबियांचे वायदे मात्र कोसळले आहेत. इंडोनेशियाच्या खालोखाल मलेशियावर आपण पामतेलासाठी सर्वाधिक अवलंबून आहोत.

रशिया व युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे सूर्यफूल तेलाच्या उपलब्धतेवर परिणाम झाला आहे. त्यातच आता पामतेलाचा पुरवठा इंडोनेशियाने अचानक थांबवण्याची घोषणा केल्यामुळे खाद्यापदार्थ तसेच सौंदर्यप्रसाधने यांच्या किंमती जगभरात वाढण्याची भीती सर्वत स्तरांतून व्यक्त होत आहे.  पामतेलाचे सर्वाधिक उत्पादन करणाऱ्य़ा इंडोनेशियाने सोमवारी पामतेलाच्या निर्यातीवर बंदी घालत सर्वांनाच धक्का दिला. ही निर्यातबंदी २८ एप्रिलपासून लागू करण्यात येणार आहे.

इंडोनेशियामध्ये खाद्य तेलासाठी आंदोलन पण झळ साऱ्या जगाला :

इंडोनेशियामध्ये सध्या खाद्यतेलाची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. रमजान ईद जवळ येत असल्यामुळे खाद्यतेलाचा देशभर सुरळित पुरवठा करणे ही राष्ट्रीय मागणी असल्याचे इंडोनेशियाच्या उद्योग मंत्रालयाने म्हटले आहे. रिटेल दुकानांतून न मिळणारे खाद्यतेल, पामतेलाच्या भडकलेल्या किंमती आणि सणाचे दिवस यांमुळे पामतेलाच्या निर्यातबंदीचा निर्णय घेणे इंडेनेशिया सरकारला भाग पडले आहे. खाद्यतेलांचा पुरवठा सुरळित करावा, म्हणून तेथे सरकारविरोधात लोक रस्त्यांवर उतरून निदर्शने करत आहेत. खाद्यपदार्थांच्या किंमती नियंत्रणात ठेवणे हे इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विदोदो यांच्यासमोरील मोठे आव्हान आहे.

सामान्य माणसाचे बजेट कोन कसे बिघडविनार ?

१.पामतेलाची टंचाई निर्माण झाल्यास सोयाबीन व सूर्यफूल तेलांचे भाव भडकणार. सोबतीला आपल्याकडे शेंगदाणा तेल ही कमी उत्पन्न यामुळे महाग होईल.

२.पामतेल चढ्या भावात उपलब्ध झाल्यास चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एफएमसीजी कंपन्यांची मिळकत घटणार.

३.पाम तेलाचा मुख्य वापरकर्ते उद्योग जसे ब्रेड, बिस्किटे, चॉकलेट, साबण, सौंदर्यप्रसाधने उत्पादन आता महागणार.बर्गर किंग इंडिया, नेसले इंडिया, हिंदुस्थान युनिलिव्हर, ब्रिटानिया, गोदरेज कन्झ्युमर, आयटीसी, डाबर यांचे उत्पादन महाग होतील.

४.खाद्यतेलांचे भाव वाढतील, ज्यामुळे सर्वसामान्यांचे मासिक बजेट कोलमडणार हे या वरील माहितीवरून आपल्याला कळलेच असेल.

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts