पेट्रोल आणि डिझल च्या दराला लागली आग आता सिलेंडर पण करणार विस्फोट !

पेट्रोल आणि डिझेल च्या दरवाढीने आधीच देशातली जनता त्रस्त आहे आणि आता केंद्र सरकार घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर (LPG) ही महाग करणार आहेत. 16 फेब्रुवारी पासून घरगुती सिलेंडर तब्बल 50 रुपयानी महागणार आहे.

देशात पेट्रोल आणि डिझेल च्या किमतीत वाढत असल्याने सामान्य जनतेच्या खरचत प्रचंड वाढ झालेली असताना आता घरगुती सिलेंडर (LPG) सर्वसामान्य लोकांचा घरगुती बजेट कोलमडून टाकणार आहे . आज पासून घरगुती वापराचा गॅस 50 रुपयांनी महागणार. महाराष्ट्रात गॅस सिलेंडर साठी 769 रुपय मोजावे लागतील. डिसेंम्बर पासून गॅस सिलेंडर मध्ये चौथ्यांदा वाढ झाली आहे.


कोरोना रोखण्यासाठी लागू केलेल्या टाळबंदीत देश भारत पेट्रोल डिझेल एलपीजिचे दर ठेवण्यात आले होते. देशातील इंधन दार जागतिक बाजाराशी संलग्न असल्याने पेट्रोलियम कंपन्या कडून दररोज इंधन दार निश्चित केले जाते. तर गॅस सिलेंडर च्या किमतीचा महीन्यात किंवा 15 दिवसात आढावा घेतला जातो.जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या दर आणि चलन विनियम यानुसार कंपन्या किरकोड विक्रीसाठी इंधन दर निश्चित करतात.

आज पासून ग्राहकांना 769 रु गॅस सिलेंडर साठी मोजावे लागतील. सध्या 14 किलोचा गॅस सिलेंडर ची किंमत 719 रु आहे  50 रुपय दर वाढी नन्तर गॅस सिलेंडर ची किंमत 769 रु होतील. पुढच्या काही महिन्यात गॅस सिलेंडर 800 रु चा आकडा गाठण्याची शक्यता आहे . पेट्रोल व डिझेल नंतर गॅस सिलेंडर ने जनतेला जोरदार झटका दिला आहे.

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts