आयुर्वेदाच्या दृष्टीने लागवड करा या पाच वनस्पतींची.

आयुर्वेदात अनेक वनस्पतींना महत्वाचं स्थान आहे. अश्याच काही या पाच वनस्पती आहेत ज्यांची घरी लागवड करून आरोग्याच्या दृष्टीने हितकारक ठरेल. कारण अनेक आजाराच्या व्याधींवर रामबाण उपाय म्हणजे आयुर्वेदिक वनस्पती आहेत. म्हणून लहान घर असो वा मोठे परंतू प्रत्येकाने या पाच आयुर्वेदिक वनस्पतींची लागवड करावी. कारण या पाच वनस्पतींचे फायदे अनेक आहेत. निसर्गाने आपल्याला सर्व काही दिले आहे त्याचा वापर आपल्याला करून घेता आला पाहिजे. आपल्याला कोणताही रोग झाला त्यावर मात करण्याची शक्ती निसर्गाने आपल्याला दिली आहे. जसे की वनस्पतीच्या माध्यमातून आपण तो रोग बरा करू शकतो. असेच काही रोग व त्यांच्यावर वनस्पतीद्वारे होणारा उपचार हे आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर बघुया या पाच आयुर्वेदिक, आरोग्याच्या दृष्टीने चमत्कारिक वनस्पती.

 

तुळस

 

तुळस ही अशी वनस्पती आहे, जी बहुतेक घरांमध्ये आढळते. मात्र, ज्यांनी अद्याप आपल्या घरात तुळस लावलेली नाही, ते औषधी वनस्पती म्हणून तुळस लावू शकतात. तुळशीची पानं स्थूलपणा कमी करणं, कोलेस्ट्रॉल नियंत्रित करणं आणि रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासह सर्दी, पडसं, घसा खवखवणं यासह इतर अनेक समस्या दूर करण्यातही उपयुक्त आहे. एवढंच नाही तर त्वचेसाठीही ती खूप फायदेशीर आहे. ते मुरुम, आणि सुरकुत्या दूर करण्यातदेखील तुळस खूप चांगली भूमिका बजावते.

 

पुदिना

 

घरात पुदिनाचं रोपटं जरूर लावा. हाही औषधी वनस्पतीच्या श्रेणीत येतो. याच्या सेवनाने शारीरिक दुर्बलता, जुलाब, आमांश, ताप, पोटाचे आजार, यकृत यासारख्या समस्यांमध्ये आराम मिळतो. तसंच, उन्हामुळं होणारा दाह, मुरुम, मुरुम यासारख्या त्वचेशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळवण्यातही पुदिना चांगली भूमिका बजावतो.

 

गवती चहा

 

गवती चहाविषयी सर्वांना माहिती असते. याचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. याच्यामुळं रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. यासोबतच पोटाची सूज, पोट फुगणे, पोटदुखी, अपचन, बद्धकोष्ठता, जुलाब, उलट्या आणि पोटात मुरडा येणं यासारख्या पचनाशी संबंधित समस्यांपासून मुक्त करण्याचं काम करते. यासोबतच डोकंदुखी, अंगदुखी आणि घसा खवखवणं यासारख्या इतर अनेक समस्या दूर करण्यातही त्याची खूप मदत होते.

 

अडुळसा

 

या वनस्पतीचा उपयोग खोकला बरा होण्यासाठी करतात. अडुळशाच्या पानांचा काढा किंवा रस खोकल्यासाठी घेतात. रस मधाबरोबर दिला जातो. 50-60 अडुळशाची पाने स्वच्छ धुऊन, ती एक लिटर पाण्यात अर्ध्या तासाकरता मंद आचेवर उकळावी. साधारण पावपट पाणी उरले पाहिजे. हा काढा गार करून गाळून ठेवावा. खोकला झाल्यास 20 मि.लि. काढा दिवसातून 2 ते 3 वेळा या प्रमाणात 3 दिवस द्यावा. लहान थोर व्यक्तींना हा काढा उपयुक्त आहे. हे असताना इतर खोकल्याच्या बाटल्यांची गरज नसते.

 

पानफुटी

 

मुतखड्यासारख्या त्रासदायक आजारावर जालीम उपाय असलेल्या या वनस्पतीसमोर एकही औषध उपयोगी ठरत नाही. ही वनस्पती मुतखडा, हाय ब्लड प्रेशर, डायबेटिज, लघवीच्या समस्या, विंचू दंश, कानदुखी, चेहऱ्यावरील पिंपल्स, डाग, मुरूम यासारख्या रोगांवर रामबाण उपाय आहे. तसेच या वनस्पतीचे अनेक आयुर्वेदिक गुणधर्म आहेत.

प्रिया गोमाशे: नमस्कार, मी प्रिया गोमाशे मला लेखनाची आवड असल्यामुळे विविध विषयांवर आणि घडामोडींवर लेख लिहते.
Recent Posts