या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. हे ६ हजार रुपये २हजार रुपयांच्या तीन टप्प्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात. Direct Benefit Transfer योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातात. या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना e-KYC करण्यासाठीची शेवटची तारीख ३१ मार्च होती. आता ही मुदत वाढवण्यात आली आहे.
केंद्र सरकार लवकरच ११व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात ट्रान्सफर करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीएम किसान योजनेच्या ११व्या हप्त्याचे पैसे एप्रिल महिन्यात जारी केले जाऊ शकतात. या योजनेशी संबंधित काही समस्या असल्यास तुम्ही टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकता. केंद्र सरकारच्या या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक ६००० रुपये मिळतात. जे 3 हप्त्यांमध्ये दिले जाते. यामध्ये २०००-२००० रुपयांच्या ३ हप्त्यांचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात.
पैसे कसे मिळवाल???
PM Kisan Samman Nidhi Yojana साठी e-KYC करण्यासाठी शेवटची तारीख आता २२ मे २०२२ करण्यात आली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधीबाबत https://pmkisan.gov.in वर याची माहिती देण्यात आली आहे.
१.सर्वप्रथम तुम्हाला pmkisan.gov.in या वेबसाइटवर जावे लागेल.
२.या वेबसाईटच्या उजव्या बाजूला फार्मर्स कॉर्नरवर क्लिक करा.
३.आता तुम्हाला लाभार्थी स्थितीवर क्लिक करावे लागेल.
४.तुमची स्थिती तपासण्यासाठी तुम्हाला आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक यासारखे सर्व तपशील भरावे लागतील.
५.प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, आपण सूचीमध्ये आपले नाव तपासू शकता.
शेतकरी बांधवांना इंटरनेट वापरायची आहे अडचन मग हे करा:
तुम्हाला या योजनेशी संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास, तुम्ही हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकता. 011-23381092, 155261 या क्रमांकांवर संपर्क साधू शकता. याशिवाय 1800115526 या टोल फ्री क्रमांकावरही संपर्क साधता येईल. या क्रमांकांवर ही शेतकरी बांधव आपल्या समस्या सोडविण्यासाठी संपर्क साधू शकतात. अश्याच सरकारी योजनांची माहिती मिळविण्यासाठी आपल्या मराठी Shout ला लगेच फॉलो करा, आणि असंख्य योजनांची माहिती मिळवा.