पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आता मिशन “राष्ट्रपती-उपराष्ट्रपती” लॉन्च !

आता पुढील ३ महिन्यांमध्ये राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं असतानाच पंतप्रधान मोदी यांनी वरिष्ठ नेत्यांसोबत बैठका घेत प्रदीर्घ चर्चा केली आहे. यामध्ये राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत महिला उमेदवारांना संधी देण्याबाबत विचारमंथन झाल्याचं सांगण्यात येत आहे. पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती या महत्त्वाच्या चार पदांपैकी सध्या कोणत्याही पदावर महिला नाही. या पार्श्वभूमीवरच राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपतीपदावर एखाद्या महिला नेत्याला संधी देण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत.

पंतप्रधान मोदी याच आपल्या धक्कातंत्राचा अवलंब करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. या निवडणुकीत महिला नेत्यांना उमेदवारी देण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी अनेक ज्येष्ठ नेत्यांसोबत खलबतं केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीसह विधानसभा निवडणुकीतही देशभरातील विविध भागांमध्ये महिलांनी आक्रमकपणे भाजपच्या बाजूने मतदान केल्याचं राजकीय निरीक्षक सांगतात. त्यामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीआधी एका महत्त्वाच्या पदावर महिलेची निवड करत महिला मतदारांमध्ये सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मागील काही निवडणुकांपासून महिला मतदार भाजपसाठी ‘ट्रम्प कार्ड’ ठरल्या आहेत.

 

यंदा च्या राष्ट्रपतीपदी महिला विराजनार  ?

राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीपदासाठी भाजपमधून विविध महिला नेत्यांची नावे समोर येत आहेत. यामध्ये सुमित्रा महाजन, आनंदीबेन पटेल, अनुसूया उईके यांच्यासह आणखी काही महिलांची नावे राष्ट्रपतीपदासाठी आघाडीवर असल्याचे समजते. जर असे झाले तर आणखी एका महिलेला आपल्या भारताचे राष्ट्रपती पद भूषवित येईल ही फार आनंदाची बातमी आहे.

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts