पितृदोष असल्यास घरात ‘या’ समस्या निर्माण होतात. जाणून घ्या लक्षणें आणि उपाय.

हिंदु धर्मात कुणी मेल्यानंतर श्राद्ध हा पूर्वापार चालत आलेला एक पवित्र विधी मानला जातो. हा विधी पूर्ण न केल्यास किंवा काही विधीदरम्यान चूक झाल्यास, काही इतर कारणांमुळे पितृदोष हा लागत असतो. पितर म्हणजे आपले ‘पूर्वज’ अर्थात जे आज हयात नाहीत त्यांची पितृपक्षात ठरलेला वेळ, काळ आणि मुहूर्त पाहून विधिपूर्वक पूजाअर्चा केली जाते. परंतू काही लोकांना आपल्या पितरांची मृत्यु तारीख, वेळ, मुहूर्त माहीत नसतो त्यामुळे हा विधी कधी करायचा हा देखील प्रश्न पडतो. मग अश्या वेळेस २०२२ च्या येणाऱ्या भाद्रपद अमावस्या सर्वपित्री अमावस्या श्राध्द म्हणजेच रविवारी येत्या २५ तारखेला आपण हा विधी करु शकतो. खरंतर आपले पूर्वज, त्यांच्याशी वागणुकिनुसार आपल्याला शाप किंवा आशीर्वाद देत असतात. त्यामुळे पितृपक्ष कालावधीत पूर्वजांच्या नावाने श्राद्ध विधी, तर्पण, पिंडदान केल्याने ते प्रसन्न होतात आणि वारसांना शुभाशिर्वाद देतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. ज्या कुटुंबात श्राद्ध विधी केला जात नाही, त्या घरात पितृदोष निर्माण होऊ शकतो. वारंवार समस्या निर्माण होतात. कामांमध्ये यश मिळत नाही. अशावेळी हा पितृदोष दूर करून पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी श्राद्ध विधी करावा, असे सांगितले जाते. परंतु याविषयी अनेक संकेत असे आहेत जे पितृदोष आहे की नाही ते सांगत असतात. तर सर्वात आधी बघुयात पितृदोषाची लक्षणें काय सांगतात.

 

पितृदोषाची लक्षणें

 

१. कुटुंबात वडील व मुलगा यांच्या नेहमी खटके उडणे. त्यांच्या प्रचंड मतभेद असतील. विचार बिल्कुल जमत नसतील.

 

२. मुलगा किंवा मुलगी यांच्या विवाह जुळणीत नेहमी‍ बाधा उत्पन्न होत असतील. किंवा जुळलेला लग्न मोडले असेल. कुंडली जुळत असेल परंतु काही कारणात्सव विवाह जुळत नसेल.

 

३. विवाह होऊन अनेक वर्ष झाले आहेत परंतु घरात पाळणा न हलने. वारंवार गर्भपात होणे. अपंग मुले जन्माला येणे.

 

४. कुटुंबातील सदस्य एकामागे एक आजारी पडणे.

 

५. डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढणे. व्यापार व व्यवसायात नुकसान होणे. परिश्रम घेऊनही नोकरीतील प्रगती कुंटणे.

 

६. कुटूंबातील सदस्यांमध्ये आपापसात भांडण होणे. अन्न- धान्याची बरकत नसणे. वायफळ खर्च होणे.

 

७. खराब-खराब स्वप्न फिरणे.

 

८. जेवणात जर वारंवार केस निघत असेल तर हा संकेत पितृदोषाचा आहे. 

 

या कारणांमुळे पितृदोष लागतो.

 

१) धार्मिक स्थळातील म्हणजे एखाद्या मंदिराजवळील पिंपळ किंवा वडाचे झाड तोडल्यास पितृ दोष लागू शकतो.

 

२) तुम्ही तुमच्या पितरांचे योग्य प्रकारे अंत्यसंस्कार आणि श्राद्ध न केल्याने सुध्दा तुम्हाला पितृ दोष लागू शकतो.

 

३) तुम्ही जर तुमच्या पुर्वजांना म्हणजे पितरांना विसरले किंवा त्यांचा अपमान केला तरी देखील तुम्हाला पितृ दोष लागू शकतो.

 

४) तुम्ही जर का सापाची चुकी नसताना साप मारला तरी देखील तुम्हाला पितृदोष लागू शकतो.

 

पितृदोषावर उपाय

 

१. कुंडलीत पितृ दोष असल्यास त्या व्यक्तीने घरातील दक्षिण दिशाच्या भिंतीवर आपल्या स्वर्गीय नातेवाइकांचा फोटो लावून त्यावर हार चढवावा आणि प्रार्थना करावी.

 

२. स्वर्गीय नातेवाइकांच्या निर्वाण तिथीवर गरजू लोकांना किंवा ब्राह्मणाला भोजन करवावे. भोजनात मृतात्म्याचा आवडता पदार्थ सामील करावा.

 

३. त्यांच्या तिथीवर शक्य असल्यास गरीब लोकांना कपडे आणि अन्न दान करावे.

 

४. पिंपळाच्या झाडावर दुपारी जल, फूल, अक्षता, दूध, गंगाजल, आणि काळे तीळ चढवावे आणि स्वर्गीय नातेवाइकांचे स्मरण करून त्याचा आशीर्वाद घ्यावा.

 

५. संध्याकाळी दिवा लावून नाग स्तोत्र, महामृत्युंजय मंत्र, रुद्र सूक्त किंवा पितृ स्तोत्र व नवग्रह स्तोत्राचा पाठ करावा.

 

पितृपक्षात विधी कसा करावा ? 

 

शास्त्रानुसार पिंडदान आणि ब्राह्मणभोज अर्पण करून पितरांचे श्राद्ध करावे. ब्राह्मणांना श्राद्धात आदरपूर्वक बोलावून त्यांचे पाय धुवून त्यांना आसनावर बसवावे. ब्राह्मण भोजनाबरोबरच पंचबली भोजनाला विशेष महत्त्व आहे. पितरांना अर्पण करण्याचा अर्थ त्यांना पाणी देणे असा आहे. पितरांचे स्मरण करताना हातात पाणी, कुशा, अक्षत, फुले आणि काळे तीळ घेऊन त्यांना आमंत्रित करा. त्यानंतर तिचे नाव घेत अंजलीचे पाणी 5-7 किंवा 11 वेळा पृथ्वीवर टाका. कावळे हे पूर्वजांचे रूप मानले जाते. पितृपक्षात कावळ्यांना खायला द्यावे.

 

प्रिया गोमाशे: नमस्कार, मी प्रिया गोमाशे मला लेखनाची आवड असल्यामुळे विविध विषयांवर आणि घडामोडींवर लेख लिहते.
Recent Posts