कोव्हिशील्ड ची किंमत झाली कमी,खासगी रुग्णालयांमध्ये लससाठीचे पैसे कमी मोजा.

सीरमने खासगी रुग्णालयांसाठी कोव्हिशील्ड लसच्या दरात बदल केले आहेत. नव्या दरपत्रकानुसार कोव्हिशील्डच्या प्रतिडोससाठी ६०० ऐवजी आता २२५ रुपये इतका दर असेल. खासगी रुग्णालयांना यापुढे या नव्या दराने लसपुरवठा केला जाईल’, असे पूनावाला यांनी नमूद केले आहे. कोव्हिशील्ड लसचे दर कमी करण्याचा हा निर्णय केंद्र सरकारशी चर्चा केल्यानंतर घेण्यात आल्याचेही त्यांनी पुढे स्पष्ट केले.

केंद्र सरकारने अठरा वर्षांवरील सर्व नागरिकांना प्रीकॉशनरी डोस (तिसरा डोस) देण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याचे आम्ही स्वागत करत आहोत, असेही पूनावाला म्हणाले.सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी कोव्हिशील्ड लसच्या दराबाबत घेतलेल्या निर्णयाची ट्वीटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे.

अठरा वर्षांवरील सर्व नागरिकांना १० एप्रिल पासून करोना प्रतिबंधक लशीचा प्रीकॉशनरी डोस उपलब्ध होणार आहे. हे लसीकरण केवळ खासगी रुग्णालये व खासगी लसीकरण केंद्रांवरच होईल, अशी घोषणा केंद्र सरकारने केली असताना कोव्हिशील्ड लस निर्माता सीरम इन्स्टिट्युटने आज खूप मोठा निर्णय घेत लसोच्छूक नागरिकांना दिलासा दिला आहे. खासगी रुग्णालयांमध्ये या लससाठीचे दर कमी करण्यात आले आहेत.

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts