प्रिन्स फिलीप (Prince Philip) यांचे वयाच्या 99 व्या वर्षी निधन झाले आहे. बकिंगहॅम पॅलेसने याबाबतची घोषणा केली. प्रिन्स फिलिप यांनी 1947 मध्ये राजकुमारी एलिझाबेथ यांच्याशी लगीनगाठ बांधली होती. ब्रिटीश राजघराण्यातील हे सर्वात प्रदीर्घ काळसेवा देणारं जोडपं ठरलं. प्रिन्स फिलीप आणि क्वीन एलिझाबेथ यांना चाल मुलं, आठ नातवंड आणि 10 परतुंडे आहेत.
प्रिन्स फिलीप यांच्या निधनाबाबत बकिंगहम पॅलेसने याबाबत पत्रक जारी केलं आहे. ” राणी एलिझाबेथ यांनी अत्यंत दुख:द घोषणा केली आहे. प्रिय पती प्रिन्स फिलीप यांचं निधन झालं आहे. आज सकाळीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला”
प्रिन्स फिलिप यांना ड्यूक ऑफ एडिनबर्ग असंही म्हटलं जायचं. प्रिन्स फिलिप यांचा जन्म 10 जून 1921 रोजी कोर्फू (Corfu) मध्ये झाला होता. प्रिंस फिलिप यांच्या निधनानं ब्रिटनमध्ये शोककळा पसरली आहे. ब्रिटनच्या ऐतिहासिक इमारतींवरील ध्वज त्यांच्या सन्मानार्थ खाली उतरवले आहेत. तसेच राष्ट्रीय शोक देखील जाहीर करण्यात आला आहे.
झाला होता कोरोना:
माहितीनुसार मागील 16 मार्च रोजीच त्यांना दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाला होता. प्रिन्स फिलिप यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना 16 फेब्रुवारीला लंडनच्या किंग एडवर्ड सप्तम हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आलं होतं. 16 मार्च रोजी त्यांना दवाखान्यातून सुट्टी मिळाली होती. मात्र त्यांच्यावर हृदयरोगासंदर्भात उपचार सुरु होते. अशात आज सकाळी त्यांनी शेवटचा श्वास घेतला.