बिकनीवर फोटोमुळे, प्रियंका चोप्रा झाली ट्रोल!

प्रियंकाचा विकनीतला फोटो पाहून चाहते हैराण झाले आहेत. त्यात तिने बिकनीवर फोटो टाकला आहे. गेल्या अनेक दीवसांपासून प्रियंका चोप्रा तिच्या ‘अनफिनिश्ड’ या तिच्या पुस्तकामुळे चर्चेत आली होती. आणि काही काळापुर्वी तीने अमेरिकन ओपेरा विन्फ्रेला दिलेल्या मुलाखतीनंतर ती सोशल मिडियावर खूप चर्चेत होती. हल्ली ती सोशल मिडीयावर अनेक फोटो आणि आठवणी शेयर करतांना दिसते. असे करत असतांना तीने सोशल मिडियावर सगळ्या चहात्यांसाठी बिकनी टॉपमधील थ्रोबॅक फोटो टाकला आहे. मात्र तिला या फोटोवरून ट्रोल करण्यात आले आहे.


शेयर केलेला फोटो हा खुप जुना असुन या फोटोत प्रियंका फक्त 19 वर्षांची आहे. तिने व्हाइट बिकनी टॉपसोबत पलाजो परिधान केला आहे आणि त्यावर तिने भारतीय संस्कृतीचे प्रतीक बिंदी लावली आहे. हा फोटो पाहुन प्रियंकाला ओळखणं कठीण झालं आहे. आता तिच्यात भरपुर बदल झाले आहेत. हा फोटो पाहून अनेक चाहते हैराण झाले आहेत. तिच्या या कपड्यांवरून नेटीझंन्स नी नाराजी व्यक्त केली आहे. काहींनी तर तिला बेशरमदेखील म्हटले. काहींनी तर हे तर कपडे तरी आहेत काय ? इतकी घाणेरडी यासारखे कमेंट्स तिच्या इंस्टाग्राम पोस्टवर केले आहेत.


या फोटो ची माहीती देतांना प्रियंका लिहीते की, शर्मिली, कधी याबद्दल ऐकले नसेल जेव्हा ती 19 वर्षांची होती.या फोटोला आतापर्यंत 17 लाखांहून जास्त पसंती मिळाली आहे. हा फोटो पाहुन वाटत आहे की कदाचित तिचा हा फोटो मॉडेलिंगच्या दिवसांतील आहे. यात ती बोल्ड अवतारात दिसते आहे.अनेक लोक या फोटोवर कमेंट्सचा वर्षावकरतांना तीचे कौतुक सुद्धा करतांना दिसत आहेत.

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts