नवी दिल्ली:- मोबाईलवर PUBG गेम खेळत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. लोकप्रिय मोबाईल गेम PUBG आता या महिन्यापासून बंद होणार आहे. अनेक पालकांची डोकेदुखी ठरत असलेला हा गेम आता पूर्णपणे बंद करण्यात येत आहे. PUBG लाईट आता भारतातून बाहेर पडणार आहे. भारतीय आयटी नियम ,सेक्शन ६९A याप्रमाणे PUBG मोबाईल आणि PUBG मोबाईल लाईट हे मागील वर्षीच्या सप्टेंबर महिन्यापासून बंदच आहेत. तरीसुद्धा PUBG प्रेमी गेमर्स हा गेम VPN SERVER वापरून खेळत असतात.
PUBG Lite मोबाईल आता २९एप्रिलपासून बंद होणार आहे.
आता VPN SERVER वापरून सुद्धा PUBG लाईट हा गेम खेळता येणार नाही. याचे कारण असे की krafton ही कंपनी आपला गेम PUBG लाईट पूर्णपणे मागे घेत आहे.
krafton कंपनी चे शेवटचे शब्द
krafton कंपनी आपल्या PUBG लाईट या गेम ला मागे घेतांना अत्यंत दुःख होत आहे. कोरोना काळात लोकांना त्यांच्या सुरक्षेची हमी देऊन लोकांनी गेम वर खूप प्रेम केले आम्ही त्यांचे आभारी आहोत. भारतीय लोकांनी PUBG लाईट या गेम वर खूप प्रेम केले त्यांचे अभिनंदन. कोरोना काळात आम्ही भारतीय प्रेक्षकांच्या पसंदीस पडून त्यांना सुरक्षेची हमी देत मनोरंजन करण्याचे आम्हाला भाग्य मिळाले.आम्हाला गेम बंद अत्यंत अवघड होऊन गेले आहे. पण तुमच्या दिलेल्या प्रेमाबद्दल खूप आभार. आम्ही सरकार सोबत गेम विषयी अजून बोलतच आहोत काही खुशीची बातमी आम्हाला कळली तर लवकरच तुम्हाला कळवू.
PUBG च्या विरुद्ध FAUJI झाला फेल.
भारतीय गेमिंग कंपनी ने सुद्धा pubg ला मागे टाकण्याचा प्रयत्न केला पण ते तोंडावर आपटले आहेत. अक्षय कुमार सारखा ब्रँड ॲम्बेसेडर असून सुध्दा फौजी गेम जास्त लोकप्रिय होऊ शकला नाही.