राहुल द्रविड च्या ‘इंद्रा नगर का गुंडा’, चे बिहाईंड दी सीन्स वायरल.

ग्रेट वॉल म्हणवणारा, शांत डोक्याने, gentleman’s game खेळणारा आपला लाडका राहुल द्रविड याची नुकतीच एक जाहिरात प्रसिद्ध झाली. त्यात ट्रॅफिक जॅम मध्ये अडकला असल्यामुळे राहुल द्रविड वैतागून जातो. मग शांत डोक्याचा राहुल द्रविड कसा चीड चीड करून लोकांना शिव्या घालतो कसा तो समोरच्या व्यक्तीच्या वयाचा ही भान न ठेवता कसा उद्धट बोलतो असा सगळा प्रकार या जाहिरातीत दाखविला आहे.

आता बाहेर आलेल्या बिहाईंड दी सीन्स वरून राहुल द्रविड याला आपला साधा स्वभाव सोडून उद्धट वागायला किती जास्त प्रयत्न करावे लागलेत हे स्पष्ट दिसते. क्रिकटपटू विराट कोहली, अभिनेत्री दीपिका पदुकोण यांनी #RahulDravid आणि #IndiraNagarkaGunda यांसारखे टॅग वापरून राहुलच्या जाहिरातीला पाठिंबा दिला होता.

तुम्ही ही हा व्हिडिओ पाहून काही क्षण हसून आपले मनोरंजन करून राहुल द्रविड च्या अभिनय कौशल्याचा आनंद घेऊ शकता.

 

 

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts