आपला ‘कच्चा बदाम’ (Kacha Badam) या गाण्याने लोकांना सोशल मीडियावर वेळ लावणारा गाणारा गायक भुबन बद्यकर (Bhuban Badyakar) याच्याशी संबंधित एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सोमवारी रात्री बन बड्याकर हा एका अपघाताचा बळी ठरला असून , या अपघातात तो गंभीर जखमी झाला असून त्याला विशेष रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, भुवन हा कार चालवायला शिकत होता आणि याच दरम्यान त्याचा अपघात झाला आहे .
भुबन बद्यकर हा मूळचा पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील राहिवासी असून तो शेंगदाणे विकून उदरनिर्वाह करत असे. भुबन या शेंगदाणा विक्रेत्याने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ‘काचा बदाम’ हे गाणे तयार केले (Kacha Badam) . कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी तो रोज शेंगदाणे विकून 200-250 रुपये कमवत असे. कोणीतरी त्यांचे कच्चा बदाम गाणे (Kacha Badam) अपलोड केले आणि ते व्हायरल झाले. सोशल मीडियावर तो लोकप्रिय झाला. लोकांनी त्याच्या गाण्यांचे व्हिडीओ आणि इंस्टाग्राम रील्स बनवले. लहानापासून मोठयांपर्यंत या गाण्यावर लोकांनी ठुमका मारला आहे . तरुण मुलीना या गाण्याने वेळ लावलं आहे इन्स्ट्राग्राम हे कच्चा बदाम गाणं खूप ट्रेंड झालं.
भुवन बद्यकरचे त्याचा या गाण्यामुळे आयुष्य अचानक बदलले, त्याला पश्चिम बंगालमधील एका क्लबमध्ये गाण्याची ऑफरही मिळाली एवढंच नव्ह तर काही दिवसांपूर्वी संगीत कंपनीने भुबनला त्याच्या आगामी ट्यूनसाठी दीड लाख रुपये रॉयल्टी म्हणून दिले.
सोशल मीडियावर मिळालेल्या लोकप्रियतेबद्दल भुवन अचानक म्हणाला होता कि , “तुम्ही ज्या प्रकारे माझ्यावर प्रेमाचा वर्षाव केला, माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही. मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो, ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे.” भुवन बद्यकर लवकरच या अघातून बारा होवो अशे सर्व सोशल मीडिया फेम लॊकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.