एअर इंडिया हि भारतातील राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे . इंडिगो नंतर एअर इंडिया हि भारतातील दुसरी सर्वात मोठी आहे . एअर इंडिया भारतातील व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते .
भारत सरकारने २०११ मध्ये एअर इंडिया ची पुनर्रचना केली होती व त्याच वर्षी इंडिअन ऐरलायन्सला एअर इंडियायामध्ये विलीन करण्यात आले होते . २०१४ मध्ये एअर इंडिया ला स्टार अलायन्स या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळालेला होता.
एअर इंडियावर आजच्या घडीला ४२ हजार कोटी रुपयांचे कर्ज असून, त्यापैकी २२ हजार कोटी रुपयांचे कर्ज एअर इंडिया ॲसेट होल्डिंग कंपनीकडे वळवले जाणार आहे.एअर इंडियातील १०० टक्के हिस्सेदारी विकण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला . त्याआधी मर्यादित हिस्सा विकण्याचा विचार सरकारने बोलून दाखवला. पण त्यात कोणीही रस दाखवला नव्हता.
भारताचे दिग्गज उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांनी खरेदी करण्यासाठी बोली लावली होती. भारत सरकारच्या एअरलाईन्सला खरेदी करण्यासाठी टाटाने 15 सप्टेंबरला निविदा दाखल केले . या स्पर्धेत स्पाईसजेटचे प्रमोटर अजय सिंहदेखील सहभागी होता
टाटा सन्स ने हि बोली यशस्वीरीत्या जिंकलेली आहे त्याबातद्दल केंद्र सरकारडून ऑफिसिअल बोलणे यायचे आहेत . एअर इंडिया आता टाटा सन्स आपली लो कॉस्ट एअरलाईन्स एअर एशिया ही कंपनी एअर इंडियाच्या छताखाली आणण्याची शक्यता आहे. भारतीय हवाई क्षेत्रात वर्चस्व मिळविण्यासाठी टाटांनी प्रयत्न सुरु केले आहेत. टाटा कंपनीने एकदा एअरलाईन्स चालविण्याचा प्रयत्न केला होता, परंतू तो असफल ठरला होता.
संबंधीत टॉप एक्झीक्युटीव्हने ही माहितीनुसार काही काळानंतर फुल सर्व्हिस कॅरिअर विस्तारा कंपनी देखील एअर इंडियाच्या छताखाली आणले जाईल. विस्ताना हे टाटा संस आणि सिंगापूर एअरलाईन्सचे जॉईंट व्हेंचर आहे. यामध्ये हिस्सा हा 49 टक्के आहे.
मलेशिया आणि एअर एशिया बीएचडीकडे एअर एशिया इंडियामध्ये 16 टक्के वाटा आहे. मार्च 2022 नंतर एअर एशियाचा मलेशियन पार्टनर आपली 18 दशलक्ष डॉलरची हिस्सेदारी विकून कंपनीतून बाहेर पडू शकतो.
सिंगापुर इंटरनॅशनल एअरलाइंस (SIA) सोबत टाटा ग्रुपने विस्तारा नावाने संयुक्त उपक्रम सुरु केला आहे. सिंगापूर एअरलाईन्सच्या प्रवक्त्याने यावर काही बोलण्यास नकार दिला.