टीम इंडियाचे माजी कोच रवी शास्त्री कायम वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत राहिले आहेत. टीमची चांगली कामगिरी तर कधी खराब फॉर्म या सगळ्यांच्या अलीकडे जात अगदी अफेअर, गर्लफ्रेंड व आवडणारी अभिनेत्री यावरही रवी शास्त्री चर्चेतअसायचा.
रवी शास्त्री ठामपणे आपले मत लोकांपुढे मांडत असतात. त्यामुळे ते अनेकदा वादाचा भोवऱ्यात सापडलेले आहेत. रवी शास्त्रींच्या अश्या स्वभावामुळे अनेकदा त्यांना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागला आहे.
रवी शास्त्री यांचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला असून तो व्हायरल होताना दिसतो . या व्हिडीओत रवी शास्त्री यांनी आपल्या अफेअरपासून ते लग्नापर्यंतच्या सगळ्या प्रश्नांची बिनधास्त उत्तरं दिलेली आहेत. त्यांनी त्यांच्या आवडत्या अभिनेत्री बद्दल सुद्धा खुलासा केला आहे.एका मुलाखती दरम्यान अमृता सिंह बद्दल देखील बिनधास्तपणे रवी बोललेला आहे
आपल्या कारकीर्दच्या सुरुवातीच्या काळात रवी शास्त्री खूप जास्त प्रसिद्ध होता त्यामुळे अनेक मुली त्यांच्या मागे असायच्या. तरुणींमध्ये त्यांची चर्चा नेहमी असायची.रवी शास्त्री जेव्हा अमृता राव यांना डेट करायला सुरवात केली तेव्हा त्यांची भरपूर चर्चा व्हायची. अमृता सिंह सोबतची आपली पहिली भेट कशी झाली हे देखील रवी शास्त्रीने सांगितलं आहे.
रवी शास्त्री विडिओ मध्ये म्हणाले की, मी मुलींशी जास्त बोलायचो नाही. जेव्हा माझी आणि अमृताची पहिली भेटहोती ज्यामध्ये पहिली 10 मिनिटं मी ऐकत होतो आणि ती फक्त बोलत होती. यावर मुलाखत घेणाऱ्याने विचारलं की, लग्नानंतरही असंच राहिलं तर? त्यावर मिश्कीलपणे उत्तर देत तोपर्यंत मी बॉस असेन असं रवी शास्त्री म्हणाले.
रवी शास्त्री यांनी आपली आवडती अभिनेत्री स्मिता पाटील असल्याचं सांगितलं आहे .एवढंच नव्हे तर स्मिता पाटील यांचे चित्रपट अमृता सिंह यांना पाहायला आवडायचे नाहीत असा खुलासा देखील रवी शास्त्री यांनी या व्हिडीओमध्ये केलेला आहे .
अमृता यांचा एक व्हिडीओ रवी शास्त्रींनी पाहिला त्यामध्ये अमृता सिंह बॉक्सिंग करत होत्या. तसेच अनिल कपूर यांच्यासोबतचा हा सीन पाहून मला धडकी भरली असे रवी शास्त्री म्हणाले. अनिल कपूर यांची अशी अवस्था ही करू शकते तर माझं पुढे काय होणार या विचारानेच माझ्या अंगावर काटा आला होता आणि त्यामुळे मी लगेच टीव्ही बंद केला असं रवी शास्त्री या व्हिडीओमध्ये म्हटल्याचे दिसते.
रवी शास्त्री चा हा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हायरल होताना दिसत आहे. रवी शास्त्री यांचा भारतीय क्रिकेट कोच म्हणून कार्यभार संपला असून आता राहुल द्रविड हे नवीन कोच असणार आहेत.
हेही वाचा :
विराट कोहलीचं वन डे कर्णधारपद धोक्यात? BCCI कडून काही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता
T20 World CUP 2022 मध्ये या तीन खेळाळूना मिळू शकतो टीम मधून डच्चू
रोहित शर्मा असणार कर्णधार : नुझीलंड विरुद्ध T20 सामन्यासाठी भारतीय संघ जाहीर