Redmi चा झटपट चार्ज होणारा नवीन 5G स्मार्टफोन लाँच , जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

Redmi K50i 5g Launch Date And  Specification :

जवळजवळ दोन वर्षांनी रेडमी भारतात आपला नवीनतम K-सिरीज स्मार्टफोन लाँच करत आहे . मोबाईलप्रेमींची प्रतीक्षा संपणार असून , रेडमी देशात उद्या म्हणजे 20 जुलै रोजी दुपारी 12 वाजता नवीन Redmi K50i लाँच करणार आहे. रेडमी इंडियाच्या यूट्युबवर चॅनेल आणि सोशल मीडिया पेजवर याचा थेट कार्यक्रम तुम्हाला बघायला मिळेल .

रेडमी इंडियाच्या यूट्युबवर चॅनेल आणि सोशल मीडिया पेजवर याचा थेट कार्यक्रम तुम्हाला बघायला मिळेल . कंपनीने ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अमॅझॉन तर्फे एक समर्पित मायक्रो-साइट तयार केलीली असून फोन लाँच झाल्यानंतर हा लवकरच खरेदीसाठी उपलब्ध होईल.

Redmi K50i 5G अपेक्षित वैशिष्ट्ये | Redmi K50i 5g Specification

 

Redmi K50i हा 6.6-इंचाच्या IPS LCD डिस्प्लेसह येण्याची शक्यता आहे. हा फोन फुल HD+ रिझोल्यूशन आणि 144Hz रिफ्रेश रेट ऑफर करतो, MediaTek Dimensity 8100 chipset द्वारे समर्थित असण्याची श्य्कता आहे. या फोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB ची स्टोरेज क्षमता असेल.

Redmi K50i Android 13-आधारित MIUI 13 वर आधारित असू शकतो . तसेच , पाणी आणि धूळ प्रतिरोधासाठी IP53 रेटिंगसह देखील असण्याची शक्यता आहे . यात 3.5 मिमी हेडफोन जॅक, ब्लूटूथ 5.3 आणि व्हीसी लिक्विड कूलिंग देखील असण्याची शक्यता आहे.

Redmi K50i 5G कॅमेरा सेटप :

Redmi K50i मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा असू शकतो ज्यामध्ये 64MP प्राथमिक सेन्सर तसेच 8MP वाइड-एंगल लेन्स आणि 2MP मॅक्रो सेन्सर असेल . सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी 16MP फ्रंट-फेसिंग कॅमेरा असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Redmi K50i 5G बॅटरी :

Redmi K50i मध्ये 5,080mAh ची बॅटरी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल अशी अपेक्षा आहे. हा हँडसेट 163.6×74.3×8.8 मिमी आणि 200 ग्रॅम वजनाचा असू शकतो.

Redmi K50i 5G ची अपेक्षित किंमत | Redmi K50i 5G Expected Price

Redmi K50i ची किंमत अजून तरी कंपनीद्वारे जाहीर करण्यात आलेली नसून फोन लाँच झाल्यावर आपल्याला प्रत्येक्षात किंमत कळेल.  मात्र , Redmi K50i च्या बेस 6GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 24,000 रुपये ते 28,999 रुपये असण्याची शक्यता आहे.

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts