हवेतील प्रदूषण अनेक कारणांमुळे होते. औद्योगिक प्रदूषण , धुळीकण मुळे, जंगल तोड तसेच वाहने या मुळे हवेचे प्रदूषण वाढते आहे.भारतात तर जगातील सर्वात वरचे म्हणजेच टॉप 10 शहरे भारतात आहेत. दिल्लीतील हवातर श्वास घेण्या सुद्धा लायक नाही.
हवेतील घातक कणात 6 पटीने वाढ
पेट्रोल,डिझेल आणि इतर पेट्रोलियम पदार्थ च्या ज्वालानातून 10 ते 2.5 मायक्रो मीटर पेक्षा कमी व्यासाचे कण तयार होतात ते सर्वात जास्त घातक असतात.जगातील 117 देशातील 6000 पेक्षा जास्त शहरांची तुलना करून हवेची गुणवत्ता ठरवली जाते.
2011 पासून तुलणा केली तर आतापर्यंत 6 पट जास्त वाढ हवेतील प्रदूषणत झाली आहे. श्वसनाच्या विविध आजार हवेतील प्रदूषण मुळे होतात. यात दमा, छातीचे कॅन्सर इत्यादी जास्त प्रमाणात होतात.तब्बल 1.3कोटी नागरिक प्रदूषना मुळे बळी पडतात.
घातक कण
पृथ्वीवरील सर्वच पशु पक्षी याच वातावरणात श्वास घेतात त्यामुळे दूषित हवा शरीरात जाते त्यामुळे अनेकांना गंभीर आरोग्य समस्यांचा सामना करावा लागतो.अनेक शहरातील हवेची गुणवत्ता अति खराब आहे.यात नायट्रोजन डायऑक्सिइड आणि घातक कणा मुळे प्रदूषण जास्त प्रमाणात होते.
आरोग्यास धोका
घातक कणांचा व्यास पार्टस पर मिलियन (पिपीएम) 2.5पेक्षा कमी असेल तर ते फुफुसात आणि रक्तवाहिन्यांत प्रवेश करतात. त्यामुळे हृदय व रक्तवाहिन्या संबंधित आजार होतात.तसेच नायट्रोजन डायऑक्सिइड मुळे अस्थमा , खोकला, घरघर तसेच श्वासला अडथळा निर्माण होतो.
हवेतील प्रदूषण कमी करण्याच्या पद्धती
वाहनात ऊर्जा निर्माण करण्यासाठी जीवाश्म इंधनाचे ज्वलन कारावे लागते त्यामुळे हानीकारक पीपीएम तयार होतात ते टाळण्यासाठी पर्यावरण पूरक वाहनाचा वापर करावा. विद्युत ऊर्जेवर चालणारी वाहने वापरावीत.सार्वजनिक वाहनाचा वापर करावा.उद्योगिक परिसरात प्रदूषण कमी करण्यावर भर दयावा. झाडांची लागवड करावी.कचरा जाळण्या ऐवजी त्याचे कंपोस्ट करण्यावर भर दयावा.जास्तीत जास्त पर्यावरण पूरक गुंतवणूक करावी ज्यामुळे आपले घर म्हणजे पृथ्वी सुरक्षित राहील.
लेखन
वैभव रुद्रवार