रोहित शर्मा असणार कर्णधार : नुझीलंड विरुद्ध T20 सामन्यासाठी भारतीय संघ जाहीर

Image Source : BCCI

भारत आणि नुझीलंड दरम्यान तीन T-20 सामने 17 नोव्हेंबर पासून खेळले जाणार आहे त्यासाठी रोहित शर्मा ची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आहे तसेच उपकर्णधार म्हणून के.ल राहुल ला निवडण्यात आले आहे.

 

T-20 World Cup नंतर विराट कोहली T-20 सामनातील कर्णधार पद सोडणार होता त्यामुळे T-20 कर्णधार पद रोहित शर्मी कडे जाणार हे निश्चित होते BCCI याबाबत आज ट्विट करत रोहित शर्मा हा नुझीलंड विरुद्ध खेळल्या जाणारी तीन T-20 साठी कर्णधार असल्याचे स्पष्ट केले. तसेच सामन्यात खेळणाऱ्या 16 जणांची यादी जाहीर केली.

 

हा असेल भारतीय संघ : 

 

India’s T20I squad: Rohit Sharma (Captain), KL Rahul (Vice-Captain), Ruturaj Gaikwad, Shreyas Iyer, Suryakumar Yadav, Rishabh Pant (wicket-keeper), Ishan Kishan (wicket-keeper), Venkatesh Iyer, Yuzvendra Chahal, R Ashwin, Axar Patel, Avesh Khan, Bhuvneshwar Kumar, Deepak Chahar, Harshal Patel, Mohd. Siraj

 

विराट कोहली याने T-20 चे कर्णधारपद सोडले तसेच भारतीय संघाचे हेड कोच रवी शास्त्री चा पण कार्यभार संपुष्टात आला आता  मुख्य कोच म्हणून राहुल द्रविड यांच्या हाताखाली भारतीय संघ खेळणार आहे. 

T20 चे कर्णधारपद रोहितकडे : T-20 चे कर्णधारपद  कोणाकडे जाणार याकडे सर्वत्र चर्चा सुरू होती, त्यासाठी अनेकांनी आपापले मते मांडली त्यात रोहित शर्मी आणि के ल राहुल चे नाव पुढे होते मात्र रोहित शर्मा ने बाजी मारत कर्णधारपद मिळवले तशी राहुल द्रविड आणि BCCI च्या अध्यक्षाची पण पसंती होती कारण रोहित शर्मा हा उप-कर्णधार होता आणि याअगोदर त्याने टीम इंडिया साठी काही सामन्यात कर्णधारपद निभावले तसेच त्याचा रॉकर्ड पण चांगला आहे आणि IPL मध्ये मुंबई इंडियन्स साठी कर्णधारपद भूषवत त्याने पाच वेळा ट्रॉफी सुद्धा जिंकली आहे. 

मुख्य कोच म्हणून राहुल द्रविड यांच्या हाताखाली भारतीय संघ नुझीलंड विरुद्ध खेळणार आहे तसेच रोहित शर्मी च्या कर्णधारपदाखाली भारतीय संघ चांगली कामगिरी करेल अशी सर्वांना आशा आहे. 

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts