सलमान खानचे ‘Being Hungry’ नावाचे फूड ट्रक उतरले रस्त्यावर,करत आहेत मदत.

मुंबईत लोकांना ग्रोसरी शॉपमध्ये 4 तास लांब रांग लावावी लागत आहे. राहुल कनाल म्हणाले की,’या फूड ट्रकमध्ये कोरोना वॉरिअर्स आणि इतर गरजू लोकांना मदत केली जात आहे. Being Hungry हा फूड ट्रक मुंबईच्या रस्त्यांवर धावत आहे. याच्या माध्यमातून फूड किट, चहा, बिस्किट, मिनिरल वॉटर, नाष्टा यासारखे पदार्थ दिले जातात.’

लॉकडाऊनमध्ये मार्केट बंद सलमान खानच्या या अभियानात युवा सेनेचा नेता राहुल कनाल देखील सहभागी आहे. एका मुलाखतीत राहुल यांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉलिवूड अभिनेता सलमान खानने मुंबईत काम करत आहे. पोलीस अधिकारी, बीएमसी वर्कर आणि हेल्थ वर्कर यांच्याबाबत चिंता व्यक्त केली. लॉकडाऊनच्या परिस्थितीत मार्केट बंद आहे. अशावेळी गरजूंना अन्न कसं मिळेल? या प्रश्नांवर सलमान खानने उत्तर दिलं आहे.

कोरोना काळात मदतीची नितांत गरज आहे. अशा परिस्थितीत अभिनेता सलमान खान स्वतः रस्त्यावर उतरून मदत करत आहे. कोरोनाच्या काळात मुंबई पोलीस भर उन्हात रस्त्यावर उभं राहून काम करत आहेत. तर आपले फ्रंटलाईन वर्कर दिवस-रात्र काम करत आहेत. या सगळ्यांसाठी सलमान खान जेवणाचं अभियान राबवत आहे. यामध्ये सलमान खानचे फूड ट्रक जेवणं घेऊन रस्त्यावर उतरले आहेत.

कोरोना काळात राज्याला मदत करणाऱ्या सगळ्यांनाच सलमान मोफत जेवण देत आहेत. यामुळे सलमान खानची खूप चर्चा देखील झाली आहे. मुंबईत कोरोनाने गेल्यावर्षी शिरकाव केला तेव्हापासून सलमान खानचं हे अभिया सुरू आहे. सलमान त्याच्या या होणाऱ्या अन्नसेवेतील, पदार्थ खाऊन स्वतः शहानिशा केली. एवढंच नव्हे तो नियमित हे अन्न पडताळून, त्याची गुणवत्ता पारखत असतो.

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts