Samsung कडून सर्वात स्वस्त स्मार्टफोन लवकरच लॉंच, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत.

दक्षिण कोरियन कंपनी सॅमसंग आपल्या ग्राहकांसाठी स्वस्त स्मार्टफोन घेऊन येणार आहे. कंपनीनेद्वारे अधिकृतपणे आपल्या नवीन M-सिरीज स्मार्टफोनच्या लॉन्चिंगची तारीख जाहीर करण्यात आली आहे. Galaxy M13 5G आणि Galaxy M13 हे दोन स्मार्टफोन 14 जुलै रोजी दुपारी 12 वाजता बाजारात दाखल होणार. चला तर जाणून घेऊया या फोन चे फिचर्स आणि किंमत :

Samsung Galaxy M13 5G स्टोरेज :

अधिकृत माहितीनुसार , Samsung Galaxy M13 5G फोनला 11 बँडसह 5G कनेक्टिव्हिटी मिळेल तसेच यात 12GB रॅम स्टोरेज आणि ऑटो डेटा स्विचिंग फीचर असणार . तुमचे प्राथमिक सिम नेटवर्कच्या बाहेर असल्यास, त्याच्या मदतीने तुम्ही कनेक्ट केले जाणार.

Samsung Galaxy M13 5G बॅटरी आणि अंदाजे किंमत :

Samsung Galaxy M13 च्या 5G फोनला 5000 mAh बॅटरी असणार , मात्र 4G प्रकारात 4000 mAh बॅटरी उपलब्ध असणार . या फोनची किंमत जवळपास 15,000 रुपये असण्याची शक्यता आहे. कंपनीने अद्याप किंमतीबद्दल तसा खुलासा अजून केलेला नाही.

Samsung Galaxy M13 4G कॅमेरा :

Galaxy M13 4G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असणार . सध्या, कंपनीने कॅमेरा सेन्सरबद्दल अधिकृत कोणतीही माहिती जारी केलेली नाही. फोनला 50MP मुख्य कॅमेरा, 5MP अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 2MP डेप्थ कॅमेरा सेन्सर असण्याची शक्यता आहे.

Samsung Galaxy M14 4G बॅटरी आणि कलर चॉईस :

Galaxy M14 6000 mAh बॅटरीसह येईल, ज्यात 15W फास्ट चार्जिंग सपोर्ट असणार. Amazon India ने आपल्या साइटवर खुलासा केला आहे की हा स्मार्टफोन ग्रीन आणि डार्क ब्लू या दोन रंगांच्या पर्यायांसह उपलब्ध असेल.

Samsung Galaxy M13 कॅमेरा आणि कनेक्टिव्हिटी :

Galaxy M13 5G हा ड्युअल कॅमेरा सेटअप सह येऊ शकतो. यात 5000 mAh बॅटरी असू शकते, जी 15W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणार  Samsung Galaxy M13 5G प्रमाणे यामध्ये 11 5G बँड सपोर्ट करेल. हे दोन्ही फोने 12 जीबी रॅमसह येतील .

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts