राज्यातील अनेक भागात शनिवारी संध्याकाळी आकाशातून काहीतरी पडताना दिसलं. हा उल्कापात , तुटलेला तारा होता की अजून काही? यावर अद्याप अभ्यास आणि सोशल मीडिया वरती चर्चा सुरु आहे. मात्र, या घटनेमुळे नागरिकांच्या मनात भीती आणि उत्सुकता पाहायला मिळाली. राज्यात वाशिम, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, उस्मानाबाद, लातूर आणि नागपुरातील काही भागातील नागरिकांना संध्याकाळच्या सुमारास आकाशातून काहीतरी पडताना पाहायला मिळालं. ती वस्तू जळताना दिसत असल्यामुळे नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली होती. मात्र, पडणारी वस्तू नेमकी काय आहे? याची नेमकी माहिती लोकांना नव्हती . असं असलं तरी आकाशातून पडणारी वस्तू किंवा वस्तूचे अवशेष हे इलेक्ट्रॉन रॉकेट बुस्टरचे तुकडे असल्याचं औरंगाबादेतील एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी माहिती दिली.
मिळालेल्या माहितीनुसारही धातूची रिंग हाेती. सध्या ती स्थानिक पाेलीस स्टेशनला जमा आहे. तर रविवारी वर्धा जिल्ह्यातील वाघाेडा येथे आकाशातून पडलेल्या धातूचा गाेळा आढळून आला. त्यामुळे हा उल्कावर्षाव नसून मानवी उपग्रह किंवा राॅकेटचे भाग असण्याच्या दाव्याला दुजाेरा मिळाला आहे.
राज्यातील नागरिकांनी व्हिडिओ काढले आणि कुतूहल व्यक्त केले.
राज्यातील विविध भागात नागरिकांना रात्री ८ च्या सुमारास तीन ते चार जळालेल्या अवस्थेतील वस्तू एकदम सरळ रेषेत आकाशातून कोसळताना पाहायला मिळाल्या. या वस्तू पडत असताना जळत असलेल्या या वस्तूंच्या मागे रॉकेटप्रमाणे किंवा विमान उडताना दिसतो तसा धूर दिसत होता. आकाशातून पडत असलेल्या या वस्तू पाहून उल्कापात होत असल्याची अफवा व्हिडिओ सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांनी उडविली. काहींनी तर विमान अपघात, त्याचबरोबर उपग्रह कोसळल्याचा अंदाजही बांधला होता. मात्र, आकाशातून पडत असलेली वस्तू नेमकी काय होती?
मग खरे काय आहे ?
ती वस्तू म्हणजे इलेक्ट्रॉन राॅकेट बुस्टरचेच तुकडे?
न्यूझीलंड येथील माहीया द्वीपकल्पावरुन भारतीय वेळेनुसार सायंकाळी ६ वाजून ११ मिनिटांनी सोडला.न्यूझीलंड येथील रॉकेट लॅब कंपनीच्या इलेक्ट्रॉन रॉकेटद्वारे ब्लॅकस्काय नावाचा उपग्रह पृथ्वीच्या ४३० किलोमीटर उंचीवर नेऊन स्थिर करण्यात आला. २ एप्रिल या तारखेत केवळ या एकाच रॉकेट उड्डाणाची नोंद आहे. त्यामुळे सायंकाळी उत्तर – पुर्व महाराष्ट्रात दिसलेली वस्तू ही या इलेक्ट्रॉन रॉकेटच्या बुस्टरचीच आहे. आपल्या भागात साधारण ३० ते ३५ किमी उंचीवरून बुस्टरचे म्हणजे रॉकेट ला उंच प्रस्तापित करणारे इंजिन यांच्या वातावरणाशी घर्षण झाल्याने एकामागोमाग एक असे ते जळत गेले. दिसणाऱ्या घटनेचा मार्ग आणि प्रकाशमान याचा अंदाज घेतला तर ही कोणताही उल्का वर्षाव किंवा उडती तबकडी सारखी घटना नाही हे निश्चित असल्याचं औंधकर म्हणाले. पण यामुळे लोक आता थोडे सतर्क राहत असून अश्या गोष्टी पुन्हा होऊ नये म्हणून प्रार्थना करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसारही धातूची रिंग हाेती. सध्या ती स्थानिक पाेलीस स्टेशनला जमा आहे. तर रविवारी वर्धा जिल्ह्यातील वाघाेडा येथे आकाशातून पडलेल्या धातूचा गाेळा आढळून आला. त्यामुळे हा उल्कावर्षाव नसून मानवी उपग्रह किंवा राॅकेटचे भाग असण्याच्या दाव्याला दुजाेरा मिळाला आहे.