Jio आणि Airtel ला टक्कर एलोन मस्क भारतात ‘सॅटेलाइट इंटरनेट प्रोजेक्ट’ आणण्याचा तयारीत !

२०२० च्या ऑगस्टमध्ये भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण(TRAI) ने जारी केले होते ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी वाढविण्याबाबत सल्लामसलतपत्र .

विश्वात सर्वाधिक श्रीमंत उद्योजक एलोन मस्क यांनी ऑटोमोबाईल आणि अंतराळ क्षेत्रात चांगलीच प्रगती प्रगती केली आहे. आणि मस्क आता टेलिकॉम क्षेत्रामध्येही पण गुंतवणूक करण्याचे ठरविले आहे. त्यादृष्टीनेच त्यांनी याची सुरुवात भारतातून करण्याचे मस्क यांनी ठरविले आहे.


गेल्याकाही महिन्यांपासून टेलिकॉम क्षेत्रात मोठ्या प्रमाणामत वाढ होत आहे. एका पत्रकाराच्या रिपोर्टनुसार स्पेसएक्स सॅटेलाइट बेस्ड सेवा भारतात सुरु करू शकते. स्टारलिंक प्रकल्पाद्वारे ही कंपनी जगातील कुठल्याही ठिकाणी सेवा पोहचवू शकते. कंपनीच्या माहितीनुसार या सेवेचे जगभरात अद्याप १० हजार युजर्स आहेत.

CNBC-TV18 न्यूज चॅनेलच्या रिपोर्टनुसार ,SpaceX कंपनीच्या स्टारलिंक प्रकल्पाला एलॉन मस्क भारतात आणण्याचचा प्रयत्न करीत आहेत. भारत आणि चीनमधील १ ट्रिलियन मार्केटवर एलोन मस्कची नजर आहे.कंपनी आपली इन -फ्लाइट इंटरनेट आणि मरिनटाइम ही सेवा या दोन्ही देशाला देऊ इच्छित आहे.


२०२० साली ऑगस्टमध्ये ऑगस्टमध्ये भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण(TRAI) ने ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी वाढविण्याबाबत सल्लामसलतपत्र जारी केले होते.ज्याला उत्तर देत स्पेसएक्स सॅटेलाइट गव्हर्नमेंट अफेयर चे उपाध्यक्ष “पेट्रिसीया कूपर” यांनी सांगितले कि ,जर सरकारने स्टारलिंकच्या सहकार्याने सहमती दर्शविली तर हाई स्पीड सॅटेलाइट नेटवर्कच्या माध्यमातून सर्व भारतीयांना येत्या काळात ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी दिली जाऊ शकते.

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts